गुरूजी येतील तेव्हाच भरते शाळा
By Admin | Published: August 27, 2014 01:10 AM2014-08-27T01:10:35+5:302014-08-27T01:35:25+5:30
राउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांनी शाळेच्या वेळेलाच बगल दिला आहे. त्यामुळे शिक्षक येईल त्याच वेळेवर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
राउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांनी शाळेच्या वेळेलाच बगल दिला आहे. त्यामुळे शिक्षक येईल त्याच वेळेवर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
तळेगाव येथील जि. प. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. या शैक्षणिक वर्षापासून आठव्या वर्गाला मान्यता मिळालेली आहे. या आठ वर्गांसाठी शाळेत फक्त सहाच शिक्षक आहेत. मात्र काही शिक्षक अप-डाऊन करीत असल्याने शाळेत वेळेवर येत नाहीत. परिणामी शाळा वेळेवर भरत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट पाहत बसावे लागते. शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी शाळा सोडून बाहेर खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिक्षकांनी शाळेत वेळेवर येणे गरजेचे असताना ते वेळेवर येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देवून उशिराने येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
शाळेचे मुख्याध्यापकही वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेश निर्गमचा उतारा वेळेवर मिळत नाही. त्यासाठी पालकांना शाळेत खेटा माराव्या लागत आहे. (वार्ताहर)
या संबंधी घनसावंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विपूल भागवत म्हणाले की, शिक्षकांच्या उशिरा येण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाळांची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले.
४शाळेच्या मैदानावर व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. याकडेही शाळेने लक्ष देवून परिसरात स्वच्छता करावी असी मागणी होत आहे.