ट्रँव्हल्समधून जाणारा पावणे दोन लाख रूपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 08:02 PM2020-10-04T20:02:43+5:302020-10-04T20:03:49+5:30
ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे.
खुलताबाद : ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे. दहा लाखाची ट्रँव्हल बस, पावनेदोन लाखांचा गुटखा पोलीसांनी जप्त केला.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत फुंदे म्हणाले की, इंदौर येथून जालनाकडे जाणा-या एका ट्रँव्हल बसमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांचे एक पथक कन्नडच्या दिशेने रवाना झाले. गल्ले बोरगावच्या पेट्रोल पंपासमोर एक ट्रँव्हल बस औरंगाबादच्या दिशेने येतांनी दिसली. पोलीसांनी सदरील ट्रँव्हल बसची तपासणी केली असता बसमध्ये पावनेदोन लाख रूपयांचा गुटखा सापडला. पोलीसांनी आरोपी ट्रँव्हल चालक कन्हैय्यालाल लक्ष्मीनारायण लष्करी, मुकेशकुमार विश्वकर्मा, क्लीनर राजा चैनसिंग लोदी यांना अटक केली असून ट्रँव्हल बस जप्त करण्यात आली आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक भागवत फुंदे, उपनिरिक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोंळके, सुधाकर दौड, संजय काळे, संजय देवरे, विक्रम देशमुख, नदीम शेख, किरण गोरे, रामेश्वर धापसे, द्यानेश्वर मेटे, संजय तांदळे यांच्या पथकाने केली.