युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर जीम ट्रेनरचा अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:41 PM2021-02-05T19:41:02+5:302021-02-05T19:44:21+5:30

Crime News तरुणी दिल्ली येथून लॉकडाऊन लागल्याने शहरात परतली होती

Gym trainer rapes young woman preparing for UPSC | युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर जीम ट्रेनरचा अत्याचार 

युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर जीम ट्रेनरचा अत्याचार 

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मिडीयाच्या माध्यमातून झाली ओळखलग्न झालेले असताना अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष

औरंगाबाद: यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विवाहित जीम ट्रेनरने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली . याविषयी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला.कार्तिक राजू लोकल (रा. कडा कार्यालय क्वार्टर)असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर 

पोलिसांनी सांगितले की, शहरातील विवाहित तरुणीचे पतीसोबत पटत नसल्याने ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे गतवर्षी राहत होती. २९ मार्च २०२० रोजी आरोपी कार्तिकसोबत इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर तिची ओळख झाली. या ओळखीतून दोघांचे रूपांतर मैत्रित आणि नंतर प्रेमात झाले. तेव्हा तिने ती पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे तर त्याने तो अविवाहित असल्याचे परस्परांना सांगितले. लॉकडाउन लागल्याने ती औरंगाबादला परतली तेव्हा आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १२ मे २०२० पासून २६ जानेवारी २०२१ पर्यंत लैंगिक अत्याचार केले. 
तरुणीने लग्नाची मागणी केल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत असे. यामुळे पिडितेला त्याच्यावर संशय आल्याने तिने थेट त्याचे घर गाठले. यावेळी कार्तिकचे मे २०२० मध्ये लग्न झाल्याचे तिला समजले. तिने याचा जाब विचारल्याने कार्तिकने तिला घरी जाऊन मारहाण केली. यानंतर पिडीतेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार नोंदवली. आरोपी कार्तिकविरूध्द बलात्कार करणे ,मारहाण करणे, फसवणूक करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा वायदंडे या तपास करत आहेत.

Web Title: Gym trainer rapes young woman preparing for UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.