जिम्नॅस्टिक स्पर्धेत नभ्या, रुद्राणी, रघुवीर, भूमी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:50 AM2018-07-30T00:50:28+5:302018-07-30T00:51:04+5:30
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे उदयोन्मुख खेळाडूंसाठी आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धेत नभ्या पाथ्रीकर, रुद्राणी मिठावाला, रघुवीर चांगले, भूमी पुने यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा मार्गदर्शक राहुल तांदळे व राष्ट्रीय खेळाडू संदीप गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संघटनेचे आदित्य जोशी, हर्षल मोगरे, सागर कुलकर्णी, रणजित पवार उपस्थित होते.
औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे उदयोन्मुख खेळाडूंसाठी आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धेत नभ्या पाथ्रीकर, रुद्राणी मिठावाला, रघुवीर चांगले, भूमी पुने यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा मार्गदर्शक राहुल तांदळे व राष्ट्रीय खेळाडू संदीप गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संघटनेचे आदित्य जोशी, हर्षल मोगरे, सागर कुलकर्णी, रणजित पवार उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल (६ वर्षांखालील मुले) : १. नभ्या पाथ्रीकर, २. श्रेयन मिसाळ, ३. अहान मुथा, ४. दक्ष अग्रवाल, ५. पार्थ वैद्य, ६. सार्थक वाहतुले.
मुली : १. रुद्राणी मिठावाला, २. अद्वैती जोशी, ३. श्रीखाला पानी, ४. गार्गी गुरव, ५. वेरोमिका वसे, ६. अंजनी जैन.
१० वर्षांखालील मुले : १. रघुवीर चांगले, २. प्रणम्य जोशी, ३. अथर्व पंडुरे, ४. ओमकार काचोले, ५. आदित्य घोडके, ६. पृथ्वीराज मुंढे.
मुली : १. भूमी पुने, २. ध्रुव अग्रवाल, ३. आकाक्षा क्षीरसागर, ४. सिरीज चौहान, ५. रिया निफडे, ६. रिद्धी पारेक.
बक्षीस वितरण संघटनेचे अध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी व विशाल देशपांडे यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून धैर्यशील देशमुख, ऋग्वेद जोशी, संदीप उंटवाल, संदेश चिंतलवाड, रजत मेघावाले, मयूर बोढारे, मनीष थट्टेकर, अजित बावलगावे , संतोष साबळे, तुषार काशीद, मयूर जाधव, सचिन कसारे, सौरभ भालेराव, मानसी पेरे, प्रियंका लिंगायत, भक्ती कुलकर्णी, प्राजक्ता जोशी, रेणुका रगडाल, दीपाली बजाज, स्वामिनी कुलकर्णी आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तेजस पळसकर, सोमाजी बालुरे, रोहन श्रीरामवर, राहुल श्रीरामवर, सचिन कापसे, ऋतुजा महाजन, रणजित पवार आदी परिश्रम घेत आहेत.