जिम्नॅस्टिक स्पर्धेत सर्वजित, साईनाथ, ऋषिकेश, सुहानी, गौरी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:00 AM2017-12-12T00:00:12+5:302017-12-12T00:01:14+5:30
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे नुकत्याच झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सर्वजित लिंगायत, साईनाथ जाधव, ऋषिकेश टोणगिरे, सुहानी अडणे, गौरी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रणजित पवार, राष्ट्रीय पंच वृषाली नागेश यांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे नुकत्याच झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सर्वजित लिंगायत, साईनाथ जाधव, ऋषिकेश टोणगिरे, सुहानी अडणे, गौरी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रणजित पवार, राष्ट्रीय पंच वृषाली नागेश यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल (१० वर्षांखालील मुले) : १. सर्वजित लिंगायत (म. सा. म.), २. शौर्य शर्मा (श्री छत्रपती जिमखाना), ३. कृष्ण माने (म. सा. म.), १२ वर्षांखालील मुले : १. साईनाथ जाधव (म. सा. म.), २. सुदेंदू भाले (म. सा. म.), ३. अन्वय वावरे (श्री छत्रपती जिमखाना), १४ वर्षांखालील मुले : १. ऋषिकेश टोणगिरे (म. सा. म.), २. सुभग पुजारी (गरवारे कम्युनिटी सेंटर), ३. भूषण बनकर (गरवारे कम्युनिटी सेंटर)
१० वर्षांखालील मुली : १. सुहानी अडणे, २. रिद्धी जैस्वाल, ३. खुशी बारवाल (सर्व म. सा. म.). १२ वर्षांखालील मुली : १. गौरी जाधव, २. राधिका आर्या, ३. अमृता बलांडे ( सर्व म. सा. म.).
या स्पर्धेत हर्शल मोगरे, रणजित पवार, राहुल तांदळे, विजय इंगळे, सर्वेश भाले, तनुजा गाढवे, सौ. वृषाली नागेश, दीपाली बजाज, ऋत्विक भाले , धैर्यशील देशमुख , ऋग्वेद जोशी, रजत मेघवाले, रुपेश राऊत, प्रथमेश हत्तेकर, ऋतुजा महाजन, शर्वरी लिमये, प्रियांका लिंगायत यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजयी खेळाडूंना तनुजा गाढवे, विजय इंगळे, हर्शल मोगरे व ऋतुजा महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विजयी खेळाडंूचे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातुरकर, सचिव हेमंत पातुरकर, उपाध्यक्ष मोहन डोईबळे, कोषाध्यक्ष व जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, राज्य संघटनेचे सचिव मकरंद जोशी, साईचे संचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंग राठोड, रामकृष्ण लोखंडे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे, जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.