हैदरबाग रुग्णालयाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:21 AM2017-08-19T00:21:58+5:302017-08-19T00:21:58+5:30
गेल्या पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हैदरबाग येथील रुग्णालयाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले़ अपुरा निधी आणि कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे इमारत पूर्ण होऊनही या ठिकाणी रुग्णालय सुरु झाले नव्हते़ शुक्रवारी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गेल्या पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हैदरबाग येथील रुग्णालयाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले़ अपुरा निधी आणि कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे इमारत पूर्ण होऊनही या ठिकाणी रुग्णालय सुरु झाले नव्हते़ शुक्रवारी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले़
महापालिकेने देगलूर नाका परिसरातील नागरिकांसाठी हैदरबाग येथे रुग्णालयासाठी टोलेजंग इमारत उभारली होती़, परंतु त्याचे लोकार्पण मात्र रखडले होते़ आता हे रुग्णालय सुरु झाल्यामुळे या भागातील नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही़ यावेळी व्यासपीठावर आ़डी़पी़ सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़ वसंत चव्हाण, महापौर शैलजा स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, अब्दुल गफार, शेर अली यांची उपस्थिती होती़ यावेळी आ़हेमंत पाटील यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश घेतलेल्यांवर टीका केली़
ते म्हणाले, बरे झाले हैदरबाग येथील रुग्णालयात दंतचिकित्सेची सोय आहे़ सध्या काहींचे दात बाहेर आले आहेत़ अशांना या रुग्णालयात आणून त्यांचे बाहेर आलेले दात काढता येतील, असा टोला लगावला़ त्यावर माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनीही जोरदार टोलेबाजी केली़
राज्यात तुमचे सरकार आहे, तुम्ही नांदेडचे आमदार आहात़ त्यामुळे शहराचे नेतृत्व तुम्ही करा, आम्ही तुम्हाला साथ देऊ़ जेव्हा आमची सत्ता असेल तेव्हा आम्हाला साथ द्या़ अशी साद खा़चव्हाण यांनी घातली़ तसेच शहराच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़