विद्यापीठ अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अर्धे उमेदवार बाद

By विजय सरवदे | Published: April 15, 2023 08:12 PM2023-04-15T20:12:32+5:302023-04-15T20:12:50+5:30

एकूण ३८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक २५ एप्रिल रोजी होत आहे.

Half of the candidates for the election of the Dr.BAMU Board of Studies President are eliminated | विद्यापीठ अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अर्धे उमेदवार बाद

विद्यापीठ अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अर्धे उमेदवार बाद

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : अनेक महाविद्यालयांत पात्र पदव्युत्तर अध्यापक नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत अभ्यास मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ५९ पैकी ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

एकूण ३८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक २५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी ३ ते ११ एप्रिल या कालावधीत ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बुधवारी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्यासह निवडणूक समितीचे कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. सतीश पाटील, डॉ. भारती गवळी, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. राम चव्हाण, डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. नंदिता पाटील, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ. ईश्वर मंझा आदींनी प्राप्त अर्जांची छाननी केली. यात ५९ पैकी ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी वैध-अवैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

अवैध उमेदवारांची नावे स्पष्टीकरणासह घोषित करण्यात आली असून या संदर्भात १५ एप्रिल सायंकाळपर्यंत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे उमेदवारांना अपिल दाखल करता येईल. या अपिलांवर १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. १९ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे.

निवडणूक होणारी अभ्यासमंडळे
अध्यक्षपदासाठी निवडणूक होणारी अभ्यास मंडळे अशी आहेत, यात मानव्यविद्या शाखा (१३ अभ्यास मंडळे)- अर्थशास्त्र, इंग्रजी, भुगोल, हिंदी, इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, उर्दू, सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसेजरल लॉ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा (१३ अभ्यास मंडळ)- वन्स्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, मत्स्यविद्या, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, पदार्थविज्ञान, प्राणिशास्त्र, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, कॉॅम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, वाणिज्यशास्त्र व व्यवस्थापन शास्त्र (पाच अभ्यास मंडळे) तसेच आंतरविद्या शाखा ७ अभ्यास मंडळ - शारीरिक शिक्षण संचालक, शारीरिक शिक्षण बीपीएड, शारीरिक शिक्षण प्राध्यापक, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक प्रशासन, गृहविज्ञान आदी विषयांचा समावेश आहे.

Web Title: Half of the candidates for the election of the Dr.BAMU Board of Studies President are eliminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.