अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी

By बापू सोळुंके | Published: July 25, 2024 12:49 PM2024-07-25T12:49:16+5:302024-07-25T12:50:45+5:30

पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा; पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी

Half of the rainy season is over; Only 16 percent water in the big dams in Marathwada | अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी

अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी

छत्रपती संभाजीनगर : अर्धा पावसाळा संपलाय; मात्र, मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंतेची परिस्थिती आहे. बहुतेक मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे किंवा ही धरणे कोरडी आहेत. मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी आजच्या तारखेला ३५.१७ टक्के पाणीसाठा होता.

मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत २०२२ सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत २०२२ सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत.
तीन प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरवल्याने जायकवाडी प्रकल्पात आजच्या दिवशी केवळ ४.३ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात २७.६५ टक्के पाणीसाठा होता. सीना कोळेगाव, मांजरा आणि माजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पावर जवळची शहरे आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. तेथे धरणांतील मृत साठ्यातून पाणीपुरवठा होत आहे.

धरण आजचा जलसाठा आणि गतवर्षीची स्थिती
जायकवाडी - ४.३ टक्के ---- २७.६५ टक्के
निम्न दुधना - ६.४० टक्के ------- २७.३८ टक्के
येलदरी - ३०.८ टक्के ------ ५७.८८ टक्के
सिद्धेश्वर - ५.६६ टक्के ------ ९.८७ टक्के
पेनगंगा - ४० टक्के --------- ४८.८० टक्के
मानार - २७.३६ टक्के -------- ३५.६ टक्के
निम्न तेरणा - २५ टक्के ------- २७.६० टक्के
विष्णुपुरी - ७० टक्के ----- ५३.६१ टक्के
माजलगाव - ०० ------ १६.२८ टक्के
मांजरा -- ०० ----- २३.२४ टक्के
सीना कोळेगाव - ०० ---- उणे १४ टक्के
मराठवाड्यात आजवर ५२ टक्के पाऊस

पाणलोट क्षेत्राला दमदार पावसाची अपेक्षा
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५२.२ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत आजवर ३५४.७ मिमी पाऊस विभागात झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम अशा ७५ प्रकल्पांमध्ये १६.२४ टक्के जलसाठा आहे. विभागात ५२.२ टक्के पाऊस सध्या झाल्याचे आकडे सांगत आहेत; परंतु, वस्तुस्थिती पाहिली तर हा पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा आहे. गोदावरी नदीसह ११ नद्यांचे पाणलोट क्षेत्र कमी पावसामुळे तहानले आहे. दमदार पाऊस पाणलोट क्षेत्रात न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी आहे.

जिल्हानिहाय पाऊस
छत्रपती संभाजीनगर - ५६.९ टक्के
जालना - ५५.३ टक्के
बीड - ६२.३ टक्के
लातूर - ५६.४ टक्के
धाराशिव - ६१.१ टक्के
नांदेड - ४४.४ टक्के
परभणी - ४५.८ टक्के
हिंगोली - ४३.४ टक्के
एकूण : ५२.२ टक्के

- वार्षिक सरासरी पाऊस : ६७९.५ मिमी
- जूनपासून आजवरचा पाऊस : ३५४.७ मिमी
- जुलै महिन्यात पडलेला पाऊस १७१.४ मिमी
- पेरण्या : ९७ टक्के

पाणलोट क्षेत्रात आजवर झालेला पाऊस
प्रकल्प ................. नदी क्षेत्रातील पाऊस

जायकवाडी गोदावरी .... २१८ मिमी
निम्न दुधना ........ ४२३ मिमी
येलदरी पूर्णा......... ४९३ मिमी
सिद्धेश्वर पूर्णा .......... ३१७ मिमी
माजलगाव सिंदफणा .... २६५ मिमी
मांजरा ........... ४७४ मिमी
पेनगंगा .......... ३७९ मिमी
मानार ............ ४४६ मिमी
निम्न तेरणा ............ ४२३ मिमी
विष्णुपुरी गोदावरी ........ ३८६ मिमी
सीना कोळेगाव ....... २७४ मिमी

Web Title: Half of the rainy season is over; Only 16 percent water in the big dams in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.