एकाच दिवसात दीड हजार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:29 PM2019-03-15T23:29:15+5:302019-03-15T23:29:41+5:30
हरित व स्वच्छ वाळूज एमआयडीसीसाठी उद्योगनरीतील स्टरलाईट या कंपनीने पुढाकार घेतला आहे.
वाळूज महानगर : हरित व स्वच्छ वाळूज एमआयडीसीसाठी उद्योगनरीतील स्टरलाईट या कंपनीने पुढाकार घेतला आहे. या कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकाच दिवसात जवळपास दीड हजार झाडे लावून ही झाडे जगविण्याचा संकल्प केला.
एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने तीन-चार वर्षांपूर्वी उद्योगनगरीतील प्रदुषण कमी व्हावे, यासाठी उद्योजक संघटना व कारखान्यावतीने ‘हरीत व स्वच्छ एमआयडीसी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उद्योजक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या कारखान्यासमोर तसेच एमआयडीसीच्या मोकळ्या भुखंडावर हजारो झाडे लावून ही झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाळूज उद्योगनगरीतील स्टरलाईट टेक्नालॉजी या कंपनीच्यावतीने शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, कंपनी व्यवस्थापनाचे पंकज प्रियदर्शी, प्रकल्प प्रमुख दीपक मॅथ्यू, आदित्य पालसिंग, सीएसआर विभागाच्या आंकाक्षा शर्मा, आशिष जेहूरकर, अशोक गावडे, पोपटराव रसाळ, रंगनाथ पावळ आदींची उपस्थिती होती.
एकाच दिवसात दिड हजार झाडे लावली
स्टरलाईट कंपनीतील काम करणाºया ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरवे टी-शर्ट परिधान या वृक्षारोपन मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी श्रमदान करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुने जवळपास ७०० मिटर परिसरात १४८० झाडे लावण्यात आली.