अर्धे वाळूजमहानगर बुडाले अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:50 PM2019-04-12T23:50:59+5:302019-04-12T23:51:09+5:30
वाळूज महानगर : वादळी वाºयामुळे उच्चदाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचा सिडकोतील रुख्मिणी विहार सोसायटीतील एका खोलीच्या भिंतीला स्पर्श झाल्याने इमारतीतील वीज पुरवठा खंडीत झाला.
वाळूज महानगर : वादळी वाºयामुळे उच्चदाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचा सिडकोतील रुख्मिणी विहार सोसायटीतील एका खोलीच्या भिंतीला स्पर्श झाल्याने इमारतीतील वीज पुरवठा खंडीत झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेती सोसायटीतील अनेक घरांच्या वायरिंग जळाल्या असून, वीज पुरवछा खंडीत झाल्याने अर्धे वाळूजमहानगर अंधारात बुडाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. झाला नव्हता.मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत पुरवठा पूर्ववत झाला नव्हता.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वाळूजमहानगर परिसरात वादळी वारा सुरु झाला. यामुळे सिडको वाळूज महानगरातून गेलेल्या महावितरणच्या उच्च दाब वाहिनीच्या विद्युत तारांचा रुख्मिणी विहार सोसायटीच्या इमारतीला स्पर्श झाला. या सोसायटीतील रत्नपारखे यांच्या घराच्या भिंतीला छिद्र पडले असून, संपूर्ण सोसायटीतील विद्युत वायरींग जळाली आहे.
सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे सोसायटीतील वीज पुरवठा खंडीत झाला. तसेच विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळताच महावितरणचे उपअभियंता एस.एस.उखंडे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
अर्ध्या वाळूजमहानगरात अंधार
वादळी वाºयामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे वडगाव, तीसगाव, साऊथसिटी, सिडकोवाळूजनगर आदी जवळपास अर्धे वाळूजमहानगर काळोखात बुडाले होते.