आराखड्यातील अर्ध्या कामांना फाटा

By Admin | Published: July 14, 2017 12:42 AM2017-07-14T00:42:57+5:302017-07-14T00:44:08+5:30

औरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (एनएचएआय) होणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या प्रस्तावित ७८९ कोटी रुपयांच्या प्रकल्पात मोठ्या कामांना फाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Half-work in the frame | आराखड्यातील अर्ध्या कामांना फाटा

आराखड्यातील अर्ध्या कामांना फाटा

googlenewsNext

विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (एनएचएआय) होणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या प्रस्तावित ७८९ कोटी रुपयांच्या प्रकल्पात मोठ्या कामांना फाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन किंवा तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याबाबत दिल्ली मुख्यालय विचार करीत असल्याचे वृत्त आहे. निधी कमी असल्याने कमी खर्चात हे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुळात एनएचएआय शहरातील रस्ते करण्याबाबत नकारात्मक मोडमध्ये गेले आहे. त्यामुळे जालना रोड आणि बीड बायपासच्या कामाबाबत मुख्यालय दोन आठवड्यात काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. अहमदनगरमधील एलिव्हेटेड रोडचे काम ५ कि़ मी. वरून दीड कि़ मी. वर आणले आहे. तसेच हे काम औरंगाबाद विभागाकडून नाशिक विभागाकडे गुरुवारी हॅण्डओव्हर केले आहे. यावरून लक्षात येते की, एनएचएआय शहरातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कटछाट करण्याच्या मन:स्थितीत आहे. ७८९ कोटींतून प्रस्तावित असलेल्या जालना रोड, बीड बायपासमधील कामांची कपात करण्याचे संकेत आहेत.
दोन वर्षांपासून जालना रोड, बीड बायपासच्या रुंदीकरणाबाबत वेगवेगळे आराखडे, घोषणा एनएचएआयने केल्या. परंतु सद्य:स्थितीत हे दोन्ही प्रकल्प आराखड्यानुसार होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
सुधारित आराखड्यानुसार
काम होण्याची शक्यता कमी
बीड बायपास आणि जालना रोडची एकूण लांबी ३० कि़ मी. आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ७८९ कोटी इतकी आहे. सहापदरी या रोडमध्ये सर्व्हिस रोड, सायकल ट्रॅक, फुटपाथसह ४५ ते ६० मीटर डीपी रोडचा समावेश आहे. तीन उड्डाणपूल, ६ भुयारी मार्ग, दोन रेल्वे उड्डाणपुलांचा यामध्ये समावेश आहे. जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ करून भुयारी मार्ग वाढविले. महावीर चौक, आकाशवाणी, रामनगर, अमरप्रीत चौक येथे भुयारी मार्ग तर चिकलठाणा, विमानतळ आणि के म्ब्रिज शाळेजवळ उड्डापणपूल प्रस्तावित केले. बीड बायपासवर एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौकात उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या आराखड्यानुसार काम होणे सध्या तरी धूसर झाले आहे.

Web Title: Half-work in the frame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.