हमालांना कामानुसार हमाली
By Admin | Published: May 14, 2017 11:00 PM2017-05-14T23:00:03+5:302017-05-14T23:04:11+5:30
लातूर :व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि हमला संघटनामध्ये हमालीच्या दरवाढीवर वाटाघाटी सुरू आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास ३ हजार हमाल, मापाडी, गाडीवान आणि इतर कामगारांनी हमालीचे दर वाढवून मिळावेत, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम बंद आंदोलन पुकारले होते़ सध्या व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि हमला संघटनामध्ये हमालीच्या दरवाढीवर वाटाघाटी सुरू आहे़ कामगार संघटनांकडून हमालीचे दरवाढीचे प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आले आहेत़
बाजार समितीतील हमाल, मापाडी, गाडीवानांना मिळणारी मजूरी अत्यल्प असून, ती वाढवून मिळावी, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून हमाल, मापाडी, कामगार संघटना आणि माथाडी बोर्डाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे़ २०११ मध्ये मजुरीमध्ये दरवाढ देण्यात आली होती़ त्यानंतर २०१४ मध्ये ही मजूरी वाढवून मिळणे अपेक्षित होते़ मात्र दुष्काळाचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी दरवाढ नाकारली़ कामगारांनीही दुष्काळ असल्यामुळे याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही़ मात्र यंदा चांगला पाऊसमान झाल्याने आता हमालीची मजूरी वाढवून देण्यासंदर्भात कुठलीही आडकाठी नाही़ त्यासाठी पुन्हा हमाल संघटना व माथाडी बोर्डाच्या कामगारांनी आंदोलन केले होते़