वाळूज उद्योनगरीत ३०० अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:53 PM2019-03-25T22:53:04+5:302019-03-25T22:53:15+5:30

एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी वाळूज उद्योनगरीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे.

 Hammer on the 300 encroachments of Walgese entrepreneurs | वाळूज उद्योनगरीत ३०० अतिक्रमणांवर हातोडा

वाळूज उद्योनगरीत ३०० अतिक्रमणांवर हातोडा

googlenewsNext

वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाने सोमवारी वाळूज उद्योनगरीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ३०० अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला असून, रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली जात आहे. या कारवाईमुळे चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.


उद्योनगरीत कामगार चौक, तिरंगा चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक आदी मुख्य चौकात विविध छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन आपले व्यवसाय थाटले आहे. या मुख्य चौकात पानटपऱ्या, हॉटेल, गॅरेज, पत्र्याचे शेड आदी छोट्या व्यवसायिकांना अतिक्रमणे केली आहे. या अतिक्रमणाच्या जागेवर सुरु असलेल्या ठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत होती. बहुताश व्यवसायिकांनी मुख्य चौकात अतिक्रमणे थाटल्यामुळे स्वत:च्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनाही आडचणीचा सामना करावा लागत आहे. उद्योजकांनी या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने उद्योनगरीत विविध ठिकाणी असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविली होती. मात्र, काही दिवसांतच अतिक्रमणे जैसे थे झाली होती.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता सुनिल व्यवहारे, सर्व्हेअर आरेफ पठाणल गुलाब राठोड, राजु मगरे आदींनी पोलिस बंदोस्तात सोमवारी बजाजनगरातील मोरे चौकातून अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली.

या मोहिमेअंतर्गत पंढरपूरातील तिरंगा चौक, महावीर चौक, महाराणा प्रताप चौक, कामगार चौक, आंबेडकर चौक, एनआरबी चौक, झांबड चौक, मायलान कंपनी चौक आदी भागातील जवळपास ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. यावेळी दोन जेसीबी व पाच ते सहा ट्रॅक्टरच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. १० सुरक्षा रक्षक तसेच एमआयडीसीच्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दिवसभर ही मोहिम राबविण्यात आली असून, पुढेही ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.


लोकमतचे भाकित खरे ठरले
‘लोकमत’ने राजकीय दबाव टाळण्यासाठी एमआयडीसी प्रशासन लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते. प्रशासनाने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्याने लोकमतचे भाकित खरे ठरल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.

Web Title:  Hammer on the 300 encroachments of Walgese entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.