३९ इमारतींवर पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:05 AM2021-01-03T04:05:21+5:302021-01-03T04:05:21+5:30

औरंगाबाद : पार्किंगची जागा गायब झालेल्या शहरातील तब्बल ३९ इमारतींचा शोध महापालिकेच्या नगररचना विभागाने लावला असून या इमारतींवर कारवाईचा ...

Hammer will fall on 39 buildings | ३९ इमारतींवर पडणार हातोडा

३९ इमारतींवर पडणार हातोडा

googlenewsNext

औरंगाबाद : पार्किंगची जागा गायब झालेल्या शहरातील तब्बल ३९ इमारतींचा शोध महापालिकेच्या नगररचना विभागाने लावला असून या इमारतींवर कारवाईचा हातोडा पडणार आहे.

बांधकाम परवानगी घेताना इमारतीच्या खाली पार्किंगची जागा दाखविण्यात येते. नंतर त्या जागेचा वापर व्यावसायिक वापरासाठी होतो. अशा इमारतींची यादी नगररचना विभागाने अतिक्रमण हटाव विभागाकडे सोपविली. मनपा प्रशासक रुजू होताच कारवाईला सुरुवात होणार आहे.

नगररचना विभागाने पहिल्या टप्प्यात शहरातील ३९ इमारतींची यादी तयार करून अतिक्रमण विभागाला सादर केली आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे ४ जानेवारी रोजी रुजू होणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर कारवाईला सुरुवात होणार आहे.

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून दरवर्षी किमान १ हजार इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात येते. बांधकाम परवानगी मिळवल्यानंतर संबंधित व्यावसायिक भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी महापालिकेकडे परत फिरकतच नाही. प्रत्येक परवानाधारकाला इमारतीच्या वापराप्रमाणे पार्किंगसाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. परवानगीसाठी मनपाकडे दिलेल्या नकाशात पार्किंगसाठी स्वतंत्र जागा दाखविण्यात येते. नंतर पार्किंगसाठी सोडलेल्या जागेचा वापर व्यावसायिक पद्धतीने करण्यात येतो. काही इमारतमालकांनी तर पार्किंगसाठी सोडलेल्या जागांमध्येही बांधकाम करुन त्याची विक्री केली.

चौकट...

अतिक्रमण हटाव विभागाला देण्यात आलेली यादी

जोशी हॉस्पिटल (समर्थनगर ), अलका काकाणी (मछली खडक), पंडित पळसकर (इंड्रोज हॉस्पिटल चिकलठाणा), आशुतोष नावंदर (सिडको एन ८), शिवराज गायकवाड (एन ११), भारती भक्कड (सहकारनगर), पूनमचंद अजमेरा (ज्योतीनगर), डॉ. अजंली वारे (वारे हॉस्पिटल, कोकणवाडी), रवी वट्टमवार (पदमपाणी कॉलनी, रेल्वेस्टेशन), नागेश नागापूरकर (गारखेडा ), प्रेरणा सारडा (फ्रेंडस कॉलनी), आर. बी. नागपाल (उस्मानपुरा ), अवतारसिंग सोधी (देशपांडे पुरम), पगारिया ऑटो (अदालत रोड), डॉ. पी. एस. छाबडा (उस्मानपुरा), ए. एस. बाेधनकर (उस्मानपुरा), बी. ए. भांड (गांधीनगर), प्रज्वलकुमार मिठावाला (जालना रोड), प्रेरणा सारडा (फ्रेंडस कॉलनी भू. क्र. १), सुनिता नागापुरे (रेल्वेस्टेशन), विनायक महाजन (हिरा खान ले-आऊट डेव्हलपमेंट रेल्वेस्टेशन), भारुका रोड लाईन्स (बन्सीलालनगर), डॉ. पटवर्धन (गांधीनगर), आर. बी. नागपाल (उस्मानपुरा), पी. यू. जेऊरकर (उस्मानपुरा), प्रतीक्षा मुंदडा (रोकडीया हनुमान कॉलनी), सुमनबाई देशपांडे (रोकडिया हनुमान कॉलनी), जयवंताबाई रगडे (सुजाता हौऊसिंग सोसायटी हर्सूल), विरेंद्र जयस्वाल (एन ११), सय्यद मोहम्मद इद्रीस (नागसेन कॉलनी), चेअरमन सय्यद नवीद सय्यद वसोऊद्दीन रजवी (न्यू शहाबाजार), डी. एस. बनसोडे (हर्सूल सर्वे नं. १५४), डॉ. सय्यद मुशीर अली (बसय्यैनगर बायजीपुरा), डेक्कन होंडा (अदालत रोड), रत्नप्रभा होंडा (अदालत रोड ), कोहीनूर हॉटेल (निराला बाजार) तापडिया सर्कल (निरालाबाजार), सुनील सिरसाट (विशालनगर ), दत्तात्रय परदेशी (भगवती कॉलनी गारखेडा).

Web Title: Hammer will fall on 39 buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.