कानावर हात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:05 AM2021-03-14T04:05:11+5:302021-03-14T04:05:11+5:30
लॉकडाऊनला प्रत्येकानेच आपापल्या परीने विरोध दबक्या आवाजात करण्यास सुरुवात केली. एका दक्ष कार्यकर्त्याने फोन करून आपली कैफियत मांडली, जय ...
लॉकडाऊनला प्रत्येकानेच आपापल्या परीने विरोध दबक्या आवाजात करण्यास सुरुवात केली. एका दक्ष कार्यकर्त्याने फोन करून आपली कैफियत मांडली, जय हिंद सर, कोण? बोलतंय. तुम्ही सांगा, आपण कोण? मी एक नागरिक बोलतोय, हे सरकारला शोभतंय काय, लॉकडाऊनचा मुद्दा सरकारी, निमसरकारी नोकरी करणाऱ्यांनीच लावून धरलाय ना. हो का नाही, त्यांनाच शनिवार-रविवार सुटी असते. त्यांना लॉकडाऊन केले काय, नाही केले काय, परंतु सामान्य नागरिकांना झळ सहन करावी लागणार आहे. नुकतेच गरिबांच्या हाताला काम भेटले. सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार कापून गोरगरिबांना द्यावा, मग खुशाल लॉकडाऊन करा. हो मुद्दा चांगला आहे तुमचा. तुमचे पद काय, यावर आपण आवाज उठवू.. त्यावर नेत्याने नाव व पद सांगायला नकार देत, नावाचे काय करता, आमच्या भावना लक्षात घ्या ना राव. आमचे असे झाले आहे, ‘ओठही आमचे दातही आमचेच’ असे म्हणून पार्टीने फोन कट केला.