कानावर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:36+5:302021-04-18T04:04:36+5:30
सध्या वार्षिक धान्य खरेदीचा सुरू आहे. शनिवारी सकाळी एक दांपत्य गहू खरेदीसाठी कारमधून मोंढ्यात आले. पतीराज म्हणाले, आमचे ...
सध्या वार्षिक धान्य खरेदीचा सुरू आहे. शनिवारी सकाळी एक दांपत्य गहू खरेदीसाठी कारमधून मोंढ्यात आले. पतीराज म्हणाले, आमचे मागील वर्षी लग्न झालेय. मी पहिल्यांदाच गहू खरेदीसाठी आलोय. चांगला मऊ पोळी होणारा गहू दाखवा. दुकानदाराने गव्हाचे ३ ते ४ नमुने दाखवले. पत्नी फुशारकीने म्हणाली, मी पश्चिम महाराष्ट्राची आहे. आमच्याकडे शेती आहे. पण तेथून धान्य आणणे परवडत नाही, म्हणून येथे घेतोय. असे करा बासमती गहू दाखवा. तोच गहू आमच्या शेतात पेरतात. हे ऐकून दुकानातील हमाल, कर्मचारी हसू लागले. मग तिने पतीकडे हट्टच धरला. बासमती गहूच खरेदी करायचा. दुकानदार म्हणाला की, मॅडम बासमती तांदूळ असतो, तुम्हाला शरबती गहू म्हणायचे काय. हे ऐकून पतीराज चिडले. ‘तुला काही कळत नाही, नुसत्या सासरच्या बढाया मारते. वर्ष झाले. मला शेती दाखवली नाही. आता चूप बस. दुकानदार चांगला गहू देतात. तोच खरेदी करू. चारचौघात अपमान झाल्याने पत्नीने नंतर एक शब्दही उच्चारला नाही.