शिवरायांचा हस्तलिखित इतिहास संग्रही

By Admin | Published: February 19, 2016 12:14 AM2016-02-19T00:14:25+5:302016-02-19T00:37:48+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

Handwritten history archive of Shivrajaya | शिवरायांचा हस्तलिखित इतिहास संग्रही

शिवरायांचा हस्तलिखित इतिहास संग्रही

googlenewsNext


अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ४०० वर्षांपूर्वी लिहिलेले दुर्मिळ असे हस्तलिखित इतिहास येथील प्रा. डॉ. आर. एम. हजारी यांनी संग्रहित ठेवले आहे. हस्तलिखितात छत्रपती शिवाजी महाराजांची व त्यांच्या वारसांची इत्यंभूत माहिती समाविष्ट आहे.
छत्रपती शिवरायांबद्दल अभ्यासपूर्ण व सत्यता पडताळणारा इतिहास चारशे वर्षांपूर्वीच हस्तलिखित स्वरूपात आहे. या इतिहासाची मूळ प्रत येथील प्रा. हजारी यांच्याकडे जतन आहे. त्यांनी ही प्रत अनेक इतिहास संशोधकांना दाखविली. या हस्तलिखिताधारे अनेकांनी पाहिजे तसा संदर्भ घेतला व स्वत:च्या नावाने ग्रंथ प्रकाशित केले. मात्र, मूळ व जुना हस्तलिखित इतिहास आजही दुर्लक्षितच आहे. ग्रंथातील माहिती जनतेसमोर प्रभावीपणे समोर यावी, अशी अपेक्षा प्रा. हजारी यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Handwritten history archive of Shivrajaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.