छेडछाड प्रकरण : एक वर्ष चांगली वर्तवणूक व एक हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:05 AM2021-02-16T04:05:36+5:302021-02-16T04:05:36+5:30
खुलताबाद : तालुक्यातील पळसगाव येथील एका छेडछाडप्रकरणात खुलताबाद दिवाणी व फौजदारी न्यायालयाने आरोपीस चांगल्या वर्तणूकीचा व एक हजार ...
खुलताबाद : तालुक्यातील पळसगाव येथील एका छेडछाडप्रकरणात खुलताबाद दिवाणी व फौजदारी न्यायालयाने आरोपीस चांगल्या वर्तणूकीचा व एक हजार रूपये फिर्यादीस देण्याचा निकाल दिला आहे.
२० फेब्रुवारी २००२ रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण वाळुंजे (रा. पळसगाव) यांनी खुलताबाद ठाण्यात ज्ञानेश्वर लहानु बनकर याच्याविरोधात पत्नीची छेडछाड प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. खुलताबाद न्यायालयाचे न्यायाधीश जी. आर. तिवारी यांनी सरकारी वकील संजय मुरक्या यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी लहानु बनकर व ज्ञानेश्वर बनकर यांना प्रकरणात दोषी धरले. एक वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तवणुक व फिर्यादीस एक हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा ठोठावली.