गेवराई तालुक्यातील आमला शिवारात हरिणाची शिकार
By Admin | Published: May 23, 2016 11:29 PM2016-05-23T23:29:13+5:302016-05-23T23:33:42+5:30
गेवराई : तालुक्यातील आमला शिवारात एकाने मांसाहारासाठी हरणाची शिकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकास रविवारी रात्री रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
गेवराई : तालुक्यातील आमला शिवारात एकाने मांसाहारासाठी हरणाची शिकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकास रविवारी रात्री रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
नामदेव बन्सी राठोड (रा. रूई, ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. आमला शिवारातील सर्व्हे क्र. १०१ मध्ये राठोड हा हरणाची शिकार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून विभागीय वनाधिकारी आर. आर. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. काळे, वनपाल एस. एस. कांबळे, अरविंद पायाळ, वनरक्षक टी. डी. जोशी यांच्या पथकाने रात्री सापळा लावला. यावेळी राठोड याने मांसाहारासाठी हरणाची शिकार केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे शिकारासाठीचे जाळे, धारदार शस्त्र व हरणांचे मांस आढळून आले. त्याला रात्रीच अटक करण्यात आली. सोमवारी त्याची रवानगी तीन दिवसांच्या वन कोठडीत करण्यात आली. (वार्ताहर)