'हरिभाऊ बागडेंनी धोका दिला, दुध संघाची चौकशी लावणार'; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तार संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 04:47 PM2022-02-05T16:47:59+5:302022-02-05T16:49:14+5:30

जिल्हा दुध संघाची चौकशी लावणार; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तारांची घोषणा

Haribhau Bagde deceived; Abdul Sattar angry after supporter's defeat in District Milk federation election | 'हरिभाऊ बागडेंनी धोका दिला, दुध संघाची चौकशी लावणार'; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तार संतप्त

'हरिभाऊ बागडेंनी धोका दिला, दुध संघाची चौकशी लावणार'; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तार संतप्त

googlenewsNext

औरंगाबाद : हरिभाऊ बागडे (Abdul Sattar ) यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले असून तीन मराठा नेत्यांनी एकत्र येत एका ओबीसी उमेदवाराचा पराभव केला, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी आज झालेल्या जिल्हा दुध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समर्थकाच्या पराभवानंतर दिली. यासोबतच दुध संघाची चौकशी लावणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

जिल्हा दुध संघाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. दुध संघात आमदार हरिभाऊ बागडे यांच्या सर्वपक्षीय पॅनलने सर्वच सर्व १४ जागांवर विजय मिळवला. या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांचे नेते एकत्र आले होते. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला होती.

दरम्यान, आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे आमदार हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आमनेसामने आले. भुमरे गटाचे दिलीप निरफळ तर सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांच्यात उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात सत्तार गटाचा पराभव झाला. भुमरे गटाचे निरफळ ९ विरुद्ध ५ मतांनी निवडून आले. समर्थकाच्या पराभवानंतर, एका ओबीसी उमेदवाराच्या पराभवासाठी तीन मराठा नेते एकत्र आले. हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री सत्तार यांनी दिली. तसेच जिल्हा दुध उत्पादक संघाची चौकशी लावणार अशी घोषणाही सत्तार यांनी यावेळी केली. आ. बागडे यांच्या विरोधात फुलंब्री मतदार संघातून किशोर बलांडेंना उभे करणार असेही ते यावेळी म्हणाले.

हा शिवसेनेचा विजय 
यानंतर कॅबिनेट मंत्री भुमरे यांनी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला पाहिजे यावर मी ठाम होतो. सहकारात सर्व चालते. जिल्हा बँक निवडणुकीत झालेला प्रकार अचानक झाला. यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याची मतदारांची तयारी होती अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Haribhau Bagde deceived; Abdul Sattar angry after supporter's defeat in District Milk federation election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.