हरीनाम सप्ताहाची झाली गिनीज बुकमध्ये नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 06:32 PM2017-08-04T18:32:53+5:302017-08-04T18:34:13+5:30

एकाच ठिकाणी १० लाख भाविकांनी एकत्रित सत्संगात सहभागी होणे आणि त्यांना ८ मिनिटात  प्रसादाच्या लाडूचे वाटप करणे असे दोन जागतिक विक्रम  घडले.

The Hariname Week was recorded in the Guinness Book | हरीनाम सप्ताहाची झाली गिनीज बुकमध्ये नोंद 

हरीनाम सप्ताहाची झाली गिनीज बुकमध्ये नोंद 

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद, दि. ४ :  गंगापूर तालुक्यातील आरापूर शिवारात सुरु असलेल्या योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या १७० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी एकाच ठिकाणी १० लाख भाविकांनी एकत्रित सत्संगात सहभागी होणे आणि त्यांना ८ मिनिटात  प्रसादाच्या लाडूचे वाटप करणे असे दोन जागतिक विक्रम  घडले.

या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना प्रदान करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी सोळंकी, सप्ताह समितीचे अध्यक्ष आ. प्रशांत बंब, खा. चंद्रकांत खैरे, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The Hariname Week was recorded in the Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.