राष्ट्रीय नेमबाजीत हर्षदाला तीन मेडल, कृपाला सांघिक कास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:26 AM2018-01-08T00:26:19+5:302018-01-08T00:26:47+5:30
केरळमधील तिरुवनंतपूरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिने ३, तर कृपा पटेल हिने एक सांघिक कास्यपदक जिंकले.
औरंगाबाद : केरळमधील तिरुवनंतपूरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिने ३, तर कृपा पटेल हिने एक सांघिक कास्यपदक जिंकले.
हर्षदाने एअर पिस्टल प्रकारातील युवा गटात वैयक्तिक कास्यपदक जिंकले. तसेच हर्षदाने सांघिक युवा आणि कनिष्ठ महिला गटात अनुष्का पाटील, पूर्वा गायकवाड यांच्या साथीने महाराष्ट्राला दोन रौप्यपदके जिंकून दिली. त्याचप्रमाणे २०१५-२१६ मध्ये शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया कृपा पटेल हिने महिलांच्या सिव्हिलियन गटात गीता म्हस्के, पूर्वा गायकवाड यांच्या साथीने महाराष्ट्राला सांघिक कास्यपदक जिंकून देण्यात योगदान दिले. या दोन्ही नेमबाजांना संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डेप्युडी डीन डॉ. प्रवीण सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त यशस्वी यादव, सचिव मनीष धूत, उपाध्यक्ष पी. व्ही. कुलकर्णी, अनंत बर्वे, हेमंत मोरे आदींनी पदकविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.