पोलिसांचा धाक संपला? ‘चल हप्ता काढ’ म्हणत मुकुंदवाडीत भरदिवसा लुटमार

By सुमित डोळे | Published: July 15, 2023 03:23 PM2023-07-15T15:23:22+5:302023-07-15T15:23:35+5:30

गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरात लूटमार, प्राणघातक हल्ल्याच्या घटना सतत घडत आहेत.

Has the fear of the police ended in Chhatrapati Sambhaji Nagar? Looting in Mukundwadi in broad daylight saying 'Let's pay hafta' | पोलिसांचा धाक संपला? ‘चल हप्ता काढ’ म्हणत मुकुंदवाडीत भरदिवसा लुटमार

पोलिसांचा धाक संपला? ‘चल हप्ता काढ’ म्हणत मुकुंदवाडीत भरदिवसा लुटमार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरात तीन तासांत दोन लूटमारीच्या घटना घडल्या. यात गुन्हेगाराने व्यापाऱ्याला भरदिवसा चाकूने धमकावत दर महिन्याला दहा हजार रुपये खंडणीची मागणी केली. दीपक अशोक शिंदे (२३, रा. जय भवानीनगर) असे गुंडाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर या घटनेच्या तीन तासांनंतरच याच परिसरात महिलेलादेखील चाकू लावून लुटल्याने दहशत पसरली आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरात लूटमार, प्राणघातक हल्ल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यातच मुकुंदवाडीत शुक्रवारी तीन तासांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून लूटमारीच्या दोन घटना घडल्या. कामगार चौकात अशोक तपसे व अंगद वेताळ यांचे औषधी दुकान आहे. गुरुवारी अंगद दुकानात असताना अकरा वाजेच्या सुमारास दीपकने दुकानात जात ‘चल हप्ता काढ’ म्हणत धमकावले. अंगदने नकार देताच ‘दुकान चालवायचे असेल तर निमूटपणे महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील’ असे म्हणत चाकू लावत खिशातील एक हजार रुपये काढून ‘यापुढे वेळेवर हप्ता द्यायचा, पोलिसांकडे तक्रार केल्यास कापून टाकेन’ असे धमकावले.

व्यापाऱ्यांनी निरीक्षक विठ्ठल ससे यांना हा प्रकार कळवला. उपनिरीक्षक पंकज मोरे, गणेश वाघ, चव्हाण यांनी लगेच धाव घेतली. पोलिसांना पाहताच पळू लागलेल्या दीपकला मोरे यांनी पाठलाग करून पकडले. दीपक व अन्य गुंड वारंवार येथील व्यापाऱ्यांना खंडणी मागतात. पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. दीपकविरोधातदेखील तक्रारी आहेत. परंतु काहीही फरक पडलेला नाही. आता व्यापार करणे अवघड झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.

चाकू लावून सोन्याचे गंठण लंपास
या घटनेनंतर जय भवानीनगरमध्ये दुपारी दोन वाजता संध्या शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावून ११ ग्रॅमचे सोन्याचे गंठण एका लुटारूने हिसकावून नेले. संध्या मुलीला शाळेत आणण्यासाठी जात होत्या. तेव्हा लुटारूने पायी येत हा प्रकार केला. उपनिरीक्षक शैलेश देशमुख तपास करत आहेत.

Web Title: Has the fear of the police ended in Chhatrapati Sambhaji Nagar? Looting in Mukundwadi in broad daylight saying 'Let's pay hafta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.