वाळूज महानगरातील ७४ अतिक्रमणांवर पडणार हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:28 PM2019-05-16T22:28:13+5:302019-05-16T22:28:43+5:30
वाळूज महानगरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ७४ अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार इसल्याची माहिती सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी दिली.
सिडको वाळूज महानगरात सिडकोच्या सर्व्हिस रोड, ग्रीन बेल्ट व २५ टक्के जमिनीवरील मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करुन अनेकांनी कच्चा स्वरुपात घरे बांधली आहेत. तसेच व्यवसायही सुरु केले आहेत. एएस क्लब, पंढरपूर तिरंगा चौक आदी ठिकाणी मुख्य व अंतर्गत रस्त्यावर चौका-चौकात अतिक्रमण झाले आहे. या संदर्भात नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले. विकसित केलेल्या नागरी वसाहतीला झोपडपट्टीखा विळखा पडत आहे. त्यामुळे कसडको प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर हातोडा चालवण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी नुकतीच पथकासह सिडकोतील सर्व्हिस रोड, ग्रीन बेल्ट व २५ टक्के जमिनीवरील अतिक्रमणांची पाहणी केली. यात ७४ पेक्षा अधिक अतिक्रमण आढळून आले असून, याचा वापर निवासी व व्यवसायिक कामासाठी केला जात असल्याचे दिसून आले. सदरील संबंधितांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दिलेल्या वेळेत ते काढून न घेतल्यास प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर हातोडा चालविला जाईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.