‘त्या’ शिवशाही चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:53 PM2019-02-24T23:53:48+5:302019-02-24T23:53:57+5:30
सिग्नलवर थांबलेल्या कारला पाठीमागून जोराची धडक देत ५ प्रवाशांना जखमी करणाऱ्या शिवशाही बसचालकाविरुद्ध रविवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज महानगर : सिग्नलवर थांबलेल्या कारला पाठीमागून जोराची धडक देत ५ प्रवाशांना जखमी करणाऱ्या शिवशाही बसचालकाविरुद्ध रविवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला अटक करण्यात आली आहे.
शिवाजी चिकणे (रा. अयोध्यानगर, बजाजनगर) हे शनिवारी (दि.२३) सायंकाळी शहरातून नातेवाईकांसह कारने घरी जात होते. ते वळण घेण्यासाठी सिडको वाळूज महानगरातील सिग्नलवर उभे असताना औरंगाबादहून पुण्याकडे जाणाºया शिवशाही बसचालकाने कारला पाठीमागून जोराची धडक दिली. यात कारमधील गर्भवती महिलेसह इतर चारजण जखमी झाले होते. याप्रकरणी चिकणे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवशाही बसचालक शिवनाथ राजेंद्र केदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.