तीन शेळ्यांना फस्त करून बिबट्या जमावावर धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:29 AM2017-11-15T00:29:07+5:302017-11-15T00:29:11+5:30

कायगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणा-या बिबट्याने आता धनगरपट्टी शिवारात प्रवेश केला आहे. सोमवारी भर दुपारी वीसपेक्षा जास्त नागरिकांच्या जमावावर दोनदा धावून येण्याचा प्रयत्न या बिबट्याने केला. मात्र लोकांनी समयसूचकता दाखवल्याने सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही.

He fired three goats and ran to the dusty crowd | तीन शेळ्यांना फस्त करून बिबट्या जमावावर धावला

तीन शेळ्यांना फस्त करून बिबट्या जमावावर धावला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कायगाव : कायगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणा-या बिबट्याने आता धनगरपट्टी शिवारात प्रवेश केला आहे. सोमवारी भर दुपारी वीसपेक्षा जास्त नागरिकांच्या जमावावर दोनदा धावून येण्याचा प्रयत्न या बिबट्याने केला. मात्र लोकांनी समयसूचकता दाखवल्याने सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही. मात्र त्यानंतर रात्री बिबट्याने ३ शेळ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.
मागील तीन महिन्यांपासून कायगाव परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर वस्ती, जुने लखमापूर, जुनी गणेशवाडी, अंतापूर शिवार, सैदापूर शिवार, अहिल्याबाई बारव शिवार, भेंडाळा शिवार आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. विविध ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले. यामुळे शेतवस्त्यावर राहणा-या नागरिकांत दहशत पसरली आहे. वनविभागाने अंमळनेर वस्तीनजीक एक पिंजरा लावला आहे. दुसरा पिंजरा जामगाव शिवारात बसविण्यात आला आहे. मात्र बिबट्या अजूनही मोकाट आहे. दिवसाआड प्राण्यांवर हल्ले होत असताना वनविभागाने मात्र आता गुडघे टेकले आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण असले तरी वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करताना दिसत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिंजºयात सावज नसणे, शेतकºयांनी अनेकदा फोन करूनही घटनास्थळी न येणे, आदी प्रकाराने नागरिकांत संताप पसरला आहे.
धनगरपट्टीजवळ सोमवारी दुपारी चार वाजेदरम्यान कडूबाळ म्हसरूप यांना बिबट्या दिसला. त्यांनी ताबडतोब जवळपासच्या शेतकºयांना याबाबत माहिती दिली. काहीच वेळात सुमारे वीस ते पंचवीस शेतकरी तेथे जमले. शेतकरी जमल्याने बिबट्या बिथरला. त्याने दोन वेळा शेतकºयांचा अंगावर धावून येण्याच्या प्रयत्न केला. शेतकºयांनी घाबरून तेथून धूम ठोकली. त्यानंतर बिबट्याही जवळच्या उसाच्या शेतात लपला. या घटनेनंतर संपूर्ण रात्र धनगरपट्टीतील नागरीकांनी जागून काढली. मात्र धनगरपट्टीजवळील एका शेतवस्तीवर जब्बार अब्बास शेख यांच्या शेतात सोमवारी रात्री पुन्हा बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी त्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. शेतवस्तीवर रात्री कुणीही नव्हते त्यामुळे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

Web Title: He fired three goats and ran to the dusty crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.