अन् तांबे पालथे करुन त्यांनी गाठले घर..!

By Admin | Published: February 15, 2015 12:43 AM2015-02-15T00:43:27+5:302015-02-15T00:43:27+5:30

बीड : पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी मागील काही दिवसांत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने

He got copper from the house, he reached ..! | अन् तांबे पालथे करुन त्यांनी गाठले घर..!

अन् तांबे पालथे करुन त्यांनी गाठले घर..!

googlenewsNext


बीड : पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी मागील काही दिवसांत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने आता गुड मॉर्निंग, गुड इव्हिनींग पथके नेमली आहेत. शनिवारी पहाटे जूजगव्हाण (ता. बीड) व साळींबा (ता. वडवणी) येथे तांबे घेऊन उघड्यावर निघालेल्यांना पथकांनी नमस्कार केला. त्यामुळे अनेकांनी तांबे पालथे करुन घर गाठले.
मार्चअखेरपर्यंत १६ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट्य आहे. आराखड्यातील १०५ गावांवर स्वच्छता मिशनने विशेष ‘फोकस’ केला आहे. शनिवारी पहाटे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे व इतर अधिकाऱ्यांनी जुजगव्हाण, साळिंब्याला भेट दिली. उघड्यावर शौचासाठी जाणाऱ्यांना नमस्कार करीत शौचालय बांधून घ्या, असे आवाहन केले. त्यामुळे गावकऱ्यांनी माना खाली घालून घर गाठणे पसंत केले. यावेळी मशाल फेरी काढून दवंडी देत शौचालय जनजागरणासंदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, ११ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा कक्षातील अधिकारी, कर्मचारी, दत्तक अधिकारी, समूह समन्वयक, सरपंच, ग्रामसेवक यांनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग पथकाचा प्रयोग तत्कालीन सीईओ नितीनकुमार खाडे यांच्या कार्यकाळात राबविला होता. आता नामदेव ननावरे यांनी देखील या पथकाला सक्रिय केले. त्यामुळे अनेक जण धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: He got copper from the house, he reached ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.