दुचाकीला दोरीने बांधून श्वानाला नेले फरपटत, आदित्य ठाकरेंचे कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:07 AM2020-06-07T05:07:54+5:302020-06-07T05:08:05+5:30
औरंगाबादमधील घटना । दोघांवर गुन्हा दाखल; मन विषण्ण करणाऱ्या कृत्याने प्राणीप्रेमींमध्ये संताप
औरंगाबाद : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला खाण्यासाठी अननसातून स्फोटक पदार्थ देऊन तिला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याच्या घटनेने देशभर संताप व्यक्त होत असताना औरंगाबादेत एका श्वानाला दुचाकीला दोरीने बांधून क्रूरपणे फरपटत नेल्याचा मन विषन्न करणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर दोघा अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजबनगरमध्ये दुचाकीवरून जाणाºया दोघांनी श्वानाला दोरीने बांधून अत्यंत क्रूरपणे फरपटत नेल्याचा १४ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. ही बाब अॅनिमल पेअर्स आणि पीपल फॉर अॅनिमल (पीएफए) या श्वानप्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजली.
त्यानंतर पुष्कर शिंदे, अनुज धुप्पड, अमृता दौलताबादकर,
पौर्णिमा पंजाबी, रोहित नांदूरकर आणि अनुप नामलवार यांनी व्हिडीओची खातरजमा केली. त्यांनी चित्रीकरण करणाºयाचा शोध
घेतला. त्यानंतर पुष्कर आणि
अनुज यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे श्वानाचे रक्ताळलेल्या पायाचे ठसे आणि रक्ताचे डाग
दिसले.
आदित्य ठाकरेंचे कारवाईचे आदेश
हा व्हिडीओ श्वानप्रेमींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना टिष्ट्वटरवर टॅग केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले. महासंचालकांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत.
प्राप्त तक्रारीवरून क्रांतीचौक ठाण्यात
गुन्हा नोंदविला
आहे. आरोपींच्या मोटारसायकल क्रमांकाच्या आधारे परिवहन विभागाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त
संबंधित घटना औरंगाबाद शहरातील असल्याचे स्पष्ट झाल्याने माझ्यासह शहरातील विविध प्राणीप्रेमी संघटनांनी पुराव्यासह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
- पुष्कर शिंदे, तक्रारदार
तुळजापुरात
१६ श्वानांना
विष देऊन मारले?
उस्मानाबाद : तुळजापूरमध्ये
१५ ते १६ श्वानांवर विषप्रयोग करुन त्यांना मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे़ एका रुग्णालयासमोर त्यांचे मृतदेह टाकून देण्यात आल्याने शनिवारी रिपाइंने पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे़