प्रेयसीचा मृतदेह कन्नडच्या घाटात देणार होते फेकून; टॅक्सी चालकामुळे प्लॅन झाला चौपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 06:47 PM2022-08-20T18:47:49+5:302022-08-20T18:48:25+5:30

तिसऱ्या आरोपीला सिडको पोलिसांनी ठोकल्या बेड्या

He was going to throw his lover's body in Kannada Ghat; The plan was quadrupled due to the taxi driver | प्रेयसीचा मृतदेह कन्नडच्या घाटात देणार होते फेकून; टॅक्सी चालकामुळे प्लॅन झाला चौपट

प्रेयसीचा मृतदेह कन्नडच्या घाटात देणार होते फेकून; टॅक्सी चालकामुळे प्लॅन झाला चौपट

googlenewsNext

औरंगाबाद : विवाहित प्रेयसी अंकिता श्रीवास्तव हिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह कन्नड येथील घाटात फेकून देण्याचा निर्णय प्रियकर सौरभ लाखे याने घेतला होता. मात्र, मृतदेह गाडीत टाकल्यानंतर टॅक्सी चालकाने घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे त्याचा सगळा प्लॅनच चौपट झाला. अंकिताला शिऊरला घेऊन जाण्यापासून परत आणणे, खून करणे आणि मृतदेह घेऊन जाण्यापर्यंत सौरभला साथ दिलेला आरोपी मन्वर उस्मान शहा यास उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी बेड्या ठोकल्या.

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अंकिता श्रीवास्तवचा प्रियकर सौरभ लाखे, त्याचा मित्र मन्वर शहाने १५ ऑगस्ट रोजी सकाळीच गळा आवळून खून केला. यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी दोघे जण टॅक्सी घेऊन आले. टॅक्सी चालकाला थाप मारून मृतदेह गाडीत टाकला. काही अंतरावर गेल्यानंतर टॅक्सी चालकाला संशय आल्यामुळे त्याने कन्नडला मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी पुन्हा मृतदेह खोलीत आणून टाकला. 

त्यानंतर दोघे शिऊरला परतले. तेव्हा सौरभने मन्वरला मांस कापण्याची सुरी मागितली. ती देतानाच त्याने यापुढे सोबत येणार नसल्याचे सौरभला सांगितले. यानंतर मन्वर गाडी घेऊन गुजरातला गेला. तेथून परत येताना राज्यातील दैनिके वाचल्यानंतर आपल्याला आरोपी केल्याचे समजल्यामुळे त्याने धुळे येथेच गाडी ठेवून बसने तो शिऊरकडे निघाला. सिडकोच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक अवचार, हवालदार लालखॉ पठाण, शेवाळे यांचे पथक त्याच्या मागावर होते. पानगावजवळ बस येताच थांबवून मन्वरला पकडले. ठाण्यात आल्यानंतर त्याने घटनाक्रमाची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर करीत होते.

आणखी दोघांसोबत अनैतिक संबंध?
मृत अंकिताचे आणखी दोघांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सौरभला होता. दोन मुलांसोबतचे फोटो पाहिल्यापासून सौरभ संतप्त होता. मन्वर याने १४ ऑगस्ट रोजी तिला औरंगाबादेतून पत्नीचा बुरखा घालून शिऊरला आणत सौरभच्या गोदामात सोडले. त्यानंतर १५ ऑगस्टच्या पहाटे तोच सौरभसह अंकिताला घेऊन औरंगाबादेत आला. अंकिताचा स्वातंत्र्यदिनीच विवाहाचा आग्रह होता. खोलीवर परतल्यानंतर ती आंघोळीला गेली तेव्हाच सौरभसह मन्वरने बाहेर आल्यानंतर तिला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली.

Web Title: He was going to throw his lover's body in Kannada Ghat; The plan was quadrupled due to the taxi driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.