हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीच्या अमिषाने गंडविणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 05:35 PM2017-09-29T17:35:54+5:302017-09-29T17:36:14+5:30

स्पर्श हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची आणि जनतेची फसवणुक करणा-या संस्थेच्या कर्यालयावर धाड मारून पोलिसांनी एका जणाला अटक केली.

In a health camp, the victim's job is to commit fraud | हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीच्या अमिषाने गंडविणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात

हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीच्या अमिषाने गंडविणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात

googlenewsNext

औरंगाबाद - स्पर्श हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची आणि जनतेची फसवणुक करणा-या संस्थेच्या कर्यालयावर धाड मारून पोलिसांनी एका जणाला अटक केली. त्याच्याकडून बनावट पत्रके, बनावट नेमणुक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, मोबाईल,रोख रक्कम असा सुमारे १ लाख १५ हजार ७१० रुपयांचा ऐवज जप्त केला.
दिलीप मंगरुस्वा गुप्ता(रा.रांची,झारखंड)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी  यांनी सांगितले की, आरोपीने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पर्श संस्थेला आरोग्य कामासाठी प्रत्येक पंचायतीसाठी सर्वेअर, तालुक्यामध्ये बीपीओ, नर्स, कम्पाऊंडर, लॅब टेक्नीशियन अशी पदे भरायची आहे. विशेष म्हणजे  आरोपीने काल्डा कॉर्नरवरील चेतनानगर येथील रूख्मिणी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर स्पर्श पब्लीक हेल्थ या नावाने कार्यालय उघडले होते. आरोपीने कार्यालय सुरू केल्यापासून तेथे मॅनेजर, टेलीकॉलर, प्रोगामिंग आॅफिसर, आॅफिस बॉय, वॉचमन आणि स्टेनोग्राफर आदी पदावर दहा कर्मचारी नेमले होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात काम करणाºया बेरोजगार तरुणांना त्याने दहा ते तीस हजार रुपये वेतन देण्याचे अमिष जाहिरातीत दाखविले होते. ही जाहिरात वाचून अनेकांनी त्याच्याकडे नोकरीसाठी अर्ज दाखल केले. त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत प्रत्येकी एक हजार रुपये तो उकळत असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखेला प्राप्त झाली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे,सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चौहाण, भगवाान शिलोटे, शेख हकीम, संजय खोसरे, संतोष सुर्यवंशी,अय्युब पठाण, भावसिंग चव्हाण यांनी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी आरोपीच्या कार्यालयावर धाड मारली. यावेळी कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे आरोपीचे कामकाज सुरू होते. आरोपीची पोलिसांनी विचारपुस केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे कामकाज नियमानुसार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.  तेथे  बनावट पत्रके, बनावट नेमणुक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, मोबाईल,रोख रक्कम,लॅपटॉप आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख १५ हजार ७१०ऐवज जप्त केला.

Web Title: In a health camp, the victim's job is to commit fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.