सातारा येथील मनपाचे आरोग्य उपकेंद्र खुराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 10:55 PM2019-01-06T22:55:04+5:302019-01-06T22:55:17+5:30

सातारा वॉर्डात महानगरपालिकेचे आरोग्य उपकेंद्र (अरुंद खोलीत) खुराड्यात सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागा अपूर्ण ठरते. गरोदरमातांना उपचारासाठी येताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

 At the health center of Satara, in the health sub-center Khurad | सातारा येथील मनपाचे आरोग्य उपकेंद्र खुराड्यात

सातारा येथील मनपाचे आरोग्य उपकेंद्र खुराड्यात

googlenewsNext

औरंगाबाद : सातारा वॉर्डात महानगरपालिकेचे आरोग्य उपकेंद्र (अरुंद खोलीत) खुराड्यात सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागा अपूर्ण ठरते. गरोदरमातांना उपचारासाठी येताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.


मनपा आरोग्य विभागामार्फत चालविण्यात येणाºया विविध आरोग्य योजनांचे उपक्रमदेखील सुरू आहेत; परंतु प्रशस्त जागा असली तरी अरुंद खोलीत आरोग्य केंद्राचा कारभार चालविला जातो. सातारा-देवळाई व परिसरातून येणाºया रुग्ण व महिला, बालकांना उन्हातच रांगेत थांबावे लागते. मनपाच्या आरोग्य केंद्रात साधे स्वच्छतागृहदेखील नाही, केंद्रापासून मनपा कार्यालयातील स्वच्छतागृहात रुग्णांना जावे लागते. अशी पायपीट करणे रुग्णांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते, असेही अनेक रुग्ण व नागरिकांचे म्हणणे आहे. मनपा वॉर्ड कार्यालयाकडे स्थानिक महिलांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आरोग्य उपकेंद्रात स्वच्छतागृह उपलब्ध करावे व पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केलेली आहे; परंतु त्याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केलेले आहे.


आरोग्य उपकेंद्राकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष
गत दोन वर्षांपासून आरोग्य उपकेंद्रात असुविधा असल्याने रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. याविषयीची तक्रार मनपा आयुक्त व महापौर यांच्याकडेदेखील केलेली आहे. लस ठेवण्यासाठी लागणारे फ्रीजर मात्र त्यावेळी उपलब्ध करून दिले; परंतु साधे स्वच्छतागृह आणि पाणी उपलब्ध करून दिलेले नसल्याची खंत नगरसेविका सायली जमादार यांनी व्यक्त केली आहे.


वरिष्ठांना कळविले आहे
सातारा-देवळाई वॉर्डातील आरोग्य उपकेंद्रात स्वच्छतागृह बांधावे आणि पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची तक्रार आली होती. ती कार्यालयातून तात्काळ संबंधित अधिकारी तसेच वरिष्ठांकडे पाठविली आहे, असे वॉर्ड अधिकारी मनोहर सुरे यांनी सांगितले.

नाराजीचा सूर
सातारा आरोग्य उपकेंद्रातील सेवा-सुविधा देण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर असून, सेवा-सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा सातारा- देवळाईतील संतप्त महिलांचा मोर्चा मनपा कार्यालयावर काढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांतून देण्यात आला आहे.

Web Title:  At the health center of Satara, in the health sub-center Khurad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.