आरोग्य केंद्रच सेवकाच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:06 AM2017-11-01T00:06:30+5:302017-11-01T00:06:45+5:30
जिल्ह्यातील सर्वच जि. प. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग १, २, गट -ब ची पदे रिक्त असल्याने अनेकदा आरोग्य केंद्रांची धुरा केवळ सेवकांनाच सांभाळण्याची वेळ येत आहे. काही ठिकाणी तर सेवकही नसल्याने कर्मचाºयांना उपकेंद्राला कुलूप लावून पदभार दिलेल्या ठिकाणी धाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील सर्वच जि. प. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग १, २, गट -ब ची पदे रिक्त असल्याने अनेकदा आरोग्य केंद्रांची धुरा केवळ सेवकांनाच सांभाळण्याची वेळ येत आहे. काही ठिकाणी तर सेवकही नसल्याने कर्मचाºयांना उपकेंद्राला कुलूप लावून पदभार दिलेल्या ठिकाणी धाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांसह आरोग्य कर्मचाºयांनाही दोन-दोन ठिकाणचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे एकाही ठिकाणी काम पूर्णत्वास जात नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कर्मचारी प्रवास करण्यातच हैराण आहेत. तर दुसरीकडे रुग्ण कर्मचाºयांची प्रतीक्षा करण्यात हैराण आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे. सध्यास्थितीत वर्ग १ चे अति. जिल्हा आरोग्य आधिकारी १, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधीकारी १, वैद्यकीय अधीकारी वर्ग २ कळमनुरी १ प्रा. आ. केंद्र भांडेगाव १, फाळेगाव १, नर्सी नामदेव १, पांगरा शिंदे १, हयातनगर १, कापडसिंगी २, कवठा २, साखरा २, गोरेगाव २, जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली १ असे एकूण १६ वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे आहेत. तर वैद्यकीय आधिकारी गट - बमध्ये नरवाडी येथील आयुवेर्दिक दवाखान्यातील १, औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा १, कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा १ असे एकूण तीनही पदे रिक्तच आहेत. तर जि. प. तील आरोग्य विभागातही एकूण ३ पदे रिक्त आहेत. यामध्ये प्रशासकीय अधिकारी १, सांख्यिकी अधिकारी १ आणि जिल्हा माध्यम व प्रसिद्ध अधिकारी १ अशी एकूण ३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकूणच कारभारात अडचणी येत आहेत.