आरोग्यसेवक पेपरफुटीची व्याप्ती वाढणार; अभ्यासिकेचा मालक नाशिकहून हलवत होता सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 02:17 PM2021-03-02T14:17:02+5:302021-03-02T14:18:10+5:30

The health dept exam scam गेवराई तांडा येथे धनश्री कृषी महाविद्यालयात आरोग्यसेवक पदाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मदन बहुरे याला परीक्षा केंद्राच्या गेटवरच मायक्रो डिव्हाईसेससह चिकलठाणा पोलिसांनी अटक केली होती.

The health dept exam scam will increase; Sources said that the owner of the study room was moving scam from Nashik | आरोग्यसेवक पेपरफुटीची व्याप्ती वाढणार; अभ्यासिकेचा मालक नाशिकहून हलवत होता सूत्रं

आरोग्यसेवक पेपरफुटीची व्याप्ती वाढणार; अभ्यासिकेचा मालक नाशिकहून हलवत होता सूत्रं

googlenewsNext
ठळक मुद्देप्रति उमेदवार १० ते १५ लाख रुपयांची सुपारी५ आरोपींना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवक पदाच्या परीक्षार्थींना ज्या अभ्यासिकेतून उत्तरे सांगितली जात होती, त्या अभ्यासिकेच्या मालकाला पोलिसांनी आरोपी केले आहे. आपला या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी तो नाशिक येथे जावून तेथून सुत्रे हलवत होता. या रॅकेटने किती उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्याची हमी दिली होती, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

मदन धरमसिंग बहुरे, राहुल धरमसिंग बहुरे, फुलबेग गुलाब बेग, रमेश हरिश्चंद्र बमनावत, संतोष माधवराव रगडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात खोकडपुरा येथील एमएमसी इमारतीत गजानन अभ्यासिका चालविणारा स्वप्नील शेषराव बाहेकर (रा. उदय कॉलनी, भोईवाडा) आणि अभ्यासिकेतून पळालेला पवन कवाळे यांचा सध्या पोलीस शाेध घेत आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, गेवराई तांडा येथे धनश्री कृषी महाविद्यालयात आरोग्यसेवक पदाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मदन बहुरे याला परीक्षा केंद्राच्या गेटवरच मायक्रो डिव्हाईसेससह चिकलठाणा पोलिसांनी अटक केली होती. केंद्राबाहेर त्याचा भाऊ राहुलला तर अन्य दोन आरोपींना खोकडपुरा येथील गजानन अभ्यासिकेतून तर अन्य एकाला अन्य ठिकाणाहून अटक केली होती.

प्रति उमेदवार १० ते १५ लाख रुपयांची सुपारी
सुत्रांनी सांगितले की, आरोपींपैकी काहीजण स्पर्धा परीक्षेची तर काही पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्यांनी आरोग्यसेवक पदभरती जाहीर होण्याआधीपासून उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत १० ते १५ लाखांत नोकरीची हमी दिली होती. याकरिता त्यांनी मायक्रो डिव्हाईस इअर बड, एटीएम कार्डच्या आकाराचा मायक्रो मोबाईल ऑनलाईन खरेदी केला होता. कालच्या कारवाईत एक उमेदवार पोलिसांच्या हाती लागला तरी या रॅकेटने किती उमेदवार गळाला लावले होते आणि त्यांनी कितीजणाना असे साहित्य देऊन परीक्षा केंद्रात पाठवले होते, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

५ आरोपींना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
सोमवारी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. सी. कुंभारे आणि कर्मचाऱ्यांनी अटकेतील ५ आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला आहे, यामुळे त्यांना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती फौजदार कुंभारे आणि सरकारी वकिलांनी केली. पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरुन न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The health dept exam scam will increase; Sources said that the owner of the study room was moving scam from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.