आरोग्याचे अधिकारी-कर्मचारी

By | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:48+5:302020-12-02T04:04:48+5:30

कोरोनाचे सावट : मतदान केंद्रांवर संशयित रुग्णांवर ठेवणार लक्ष औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या ...

Health Officer-Staff | आरोग्याचे अधिकारी-कर्मचारी

आरोग्याचे अधिकारी-कर्मचारी

googlenewsNext

कोरोनाचे सावट : मतदान केंद्रांवर संशयित रुग्णांवर ठेवणार लक्ष

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तुम्ही म्हणाल उमेदवार तर जाहीर झाले, मतदानाचा दिवसही जवळ आला. हो, पण कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य अधिकारी-कर्मचारी संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रथमच मतदान केंद्रांच्या रिंगणात उतरणार आहेत.

कोरोना कालावधीमध्येच यावेळेस पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोरोनाचे संकट असले तरी प्रत्येक मतदाराच्या सुरक्षेची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक आहे. निवडणूक कामासाठी वापरण्यात येणारा परिसर, खोल्यांच्या प्रवेशव्दारावर थर्मल स्कॅनिंग, प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, सामाजिक अंतर पाळणे यासह कोरोना प्रतिबंधासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.

त्याबरोबर मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती राहणार असून, मतदाराला सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक मतदाराची ‘थर्मलगन’ने तपासणीही करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण

इतक्या वर्षाच्या सेवेत प्रथमच निवडणुकीत ड्युटी आहे. त्यासंदर्भात प्रशिक्षण झाले आहे. मतदारांचे तापमान मोजण्यात येईल. कोणी संशयित वाटल्यास स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाईल.

- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

कोरोना रोखण्यासाठी खबरदारी

कोरोनाच्या काळात निवडणूक होत आहे. त्यामुळे कोरोना वाढणार नाही, यासाठी विविध खबरदारी घेतली जात आहे. नीट, जेईई परीक्षेच्या वेळी जी काळजी घेण्यात आली, त्याप्रमाणे मतदानाच्या वेळी काळजी घेतली जाणार आहे.

-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

Web Title: Health Officer-Staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.