लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही आरोग्य अधिकारी कोरोना संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:04 AM2021-03-24T04:04:51+5:302021-03-24T04:04:51+5:30
फुलंब्रीचे तालुका आरोग्य अधिकाऱ्याने गेल्या वर्षभरापासून कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर त्यांनी पहिला व दुसरा ...
फुलंब्रीचे तालुका आरोग्य अधिकाऱ्याने गेल्या वर्षभरापासून कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर त्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला. मात्र, दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांसह नागरिकही चक्रावले आहे. सदर आरोग्य अधिकाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात
गेल्या वर्षभरात एकूण कोरोना संक्रमित रुग्णाची
संख्या ७०६ आहे. यातील ५७५ रुग्ण बरे झाले तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या १०२ कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
चौकट
तालुक्यात ४८२ लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस
तालुक्यात आतापर्यंत ९ हजार लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तर १७९६ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ४८२ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत.