आरोग्य उपकेंद्र बंद; गरीब महिलेची रस्त्यावरच प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:21 AM2018-01-03T00:21:00+5:302018-01-03T00:21:06+5:30

आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने गावोगाव फिरून पोटाची खळगी भरण्यासाठी ‘डोंबारी’चे खेळ करणाºया एका महिलेवर रस्त्यावरच प्रसूत होण्याची वेळ आली.

 Health sub-center closed; Maternity of the poor woman on the street | आरोग्य उपकेंद्र बंद; गरीब महिलेची रस्त्यावरच प्रसूती

आरोग्य उपकेंद्र बंद; गरीब महिलेची रस्त्यावरच प्रसूती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लाडसावंगी : आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने गावोगाव फिरून पोटाची खळगी भरण्यासाठी ‘डोंबारी’चे खेळ करणाºया एका महिलेवर रस्त्यावरच प्रसूत होण्याची वेळ आली. सुदैवाने आशा कार्यकर्ती मदतीला आल्याने तिने बाळंतपण सुखरूप करून दिले. ही संतापजनक घटना औरंगाबाद तालुक्यातील हातमाळी गावात मंगळवारी घडली.
दोरीवरचे खेळ दाखविणारे डोंबारी कुटुंब हातमाळी गावात आलेले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता या कुटुंबातील रेखा जितेंद्र वाघ यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. जवळच्या हातमाळी आरोग्य उपकेंद्रातही नेहमीप्रमाणे कुणीच नव्हते. त्यामुळे प्रसूतीसाठी जावे कोठे, असा प्रश्न या कुटुंबाला पडला. जवळ पैसा नसल्याने मोठ्या दवाखान्यात जाण्याची त्यांची हिंमत होईना. मंगळवार उजाडला तरीही त्रास होऊ लागल्याने रेखाबाईची सासू ताराबाई वाघ पुन्हा या आरोग्य उपकेंद्रात गेल्या, तेव्हाही हे केंद्र बंद असल्यामुळे गावातील काही महिलांनी त्यांना आशा कार्यकर्ती प्रभावती पडूळ यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. ताराबाई त्यांच्याकडे गेल्या. प्रभावती पडूळ यांनी वेळ न घालवता आपला आशा आरोग्य संच घेऊन झोपडीतच आहे त्या परिस्थितीत बाळंतपण केले. सुदैवाने रेखाबाईची प्रसूती सुखरूप झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. प्रसूती सुखरूप करून दिली म्हणून डोंबारी कुटुंबाने आशा कार्यकर्ती व गावकºयांचे आभार मानले व आरोग्य विभागाबाबत नाराजी व्यक्त केली. हातमाळी उपकेंद्र हे लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राशी जुडलेले असल्याने याविषयी वैद्यकीय आधिकारी डॉ. राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या आरोग्यसेविकेविषयी अनेक तक्रारी असून, तसे वरिष्ठांना कळविले आहे, तरीही कार्यवाही झाली नाही. वरिष्ठांनी दखल घेऊन आरोग्यसेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आरोग्य उपकेंद्र
केवळ नावालाच
हातमाळी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने हे केंद्र केवळ नावापुरतेच उरले आहे.
४शिवाय या गावातील आरोग्यसेविका महिन्यातून एकच दिवस लसीकरण सत्रासाठी गावात येते.
४हातमाळी उपकेंद्रात राहण्याची सगळी व्यवस्था असतानासुद्धा आरोग्यसेविका गावात राहत नाही, अशी माहिती गावातील लोकांनी दिली.

Web Title:  Health sub-center closed; Maternity of the poor woman on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.