आरोग्य पर्यवेक्षक लाचेच्या सापळ््यात

By Admin | Published: June 14, 2016 11:35 PM2016-06-14T23:35:16+5:302016-06-14T23:59:37+5:30

औरंगाबाद : वैद्यकीय व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्रासाठी डॉक्टरकडून चार हजार रुपयांची लाच घेताना जि.प.च्या आरोग्य पर्यवेक्षकास मंगळवारी साडेतीनच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले.

Health Supervisor Trap Trap | आरोग्य पर्यवेक्षक लाचेच्या सापळ््यात

आरोग्य पर्यवेक्षक लाचेच्या सापळ््यात

googlenewsNext

औरंगाबाद : वैद्यकीय व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्रासाठी डॉक्टरकडून चार हजार रुपयांची लाच घेताना जि.प.च्या आरोग्य पर्यवेक्षकास मंगळवारी साडेतीनच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. हिरालाल लक्ष्मण गोरे (४९, रा. फ्लॅट नं.ई-२, चिनार गार्डन, पडेगाव), असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार डॉक्टर हे २००९ पासून वैद्यकीय व्यवसाय करतात. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी जि.प.च्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने ३ नोव्हेंबर २०११ रोजी जि. प. आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी यावर्षी ११ जानेवारी, १८ फेब्रुवारी, १८ मार्च, १८ एप्रिल व १८ मे रोजी पुन्हा विनंती अर्ज केले. त्यानंतरदेखील प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी ३ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधित डॉक्टरास तातडीने वैद्यकीय व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते.
पोलीस अधीक्षक श्रीपाद परोपकारी, अतिरिक्त अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, उत्तम टाक, निरीक्षक एस.एस. शेगोकार, सचिन गवळी यांनी ही कारवाई केली. संदीप आव्हाळे, अजय आवले, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीश घोडके, किशोर म्हस्के, चालक दिलीप राजपूत यांनी मदत केली.
आरोपीविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पाच हजारांची मागणी
आरोपी गोरे याने त्यानंतर तक्रारदाराशी संपर्क साधला, तुमचे काम माझ्याकडेच आहे. प्रमाणपत्राची फाईल ‘पूटअप’ करण्यासाठी १ हजार रुपये शुल्क आणि ५ हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केली.
याबाबत केलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पडताळणी केली असता, पंच साक्षीदारासमोर आरोपीने पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपये घेण्यास आरोपी तयार झाला. जि.प.च्या आरोग्य विभागात लगेचच लाचेची रक्कम आणून देण्याची मागणी त्याने केली. आरोग्य विभागात सापळा रचून आरोपीला लाच घेताना पकडण्यात आले.

Web Title: Health Supervisor Trap Trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.