वेबसाईटचे आरोग्य बिघडले, परीक्षार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:02 AM2021-09-25T04:02:02+5:302021-09-25T04:02:02+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज ...
सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळाला (वेबसाईट) भेट देली. मात्र, हे संकेतस्थळ खूपच संथगतीने चालते, तर कधी हँग होते. त्यामुळे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. काही परीक्षार्थ्यांना परजिल्ह्यांत केंद्र मिळाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल का, ही चिंता उमेदवार व त्यांच्या पालकांना लागली आहे.
-------------------
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण परीक्षा केंद्रे - १५७
२५ सप्टेंबर रोजी - ४३ हजार १७२ परीक्षार्थी
२६ सप्टेंबर रोजी- २२ हजार ८८६ परीक्षार्थी
एकूण परीक्षार्थी- ६६ हजार ५८
-----------------------------
------------------------------
दोन सत्रांत होईल परीक्षा
गट ‘क’ आणि गट ‘ड’ प्रवर्गातील विविध रिक्त पदांसाठी शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना परीक्षेच्या एक तास आधी केंद्रांवर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---------------------------
नोडल अधिकाऱ्यांचा कोट
प्रवेशपत्रात चुका असल्याच्या तक्रार निवारण्यासाठी प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार असेल, तर सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत संबंधितांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. प्रवेशपत्रातील चुका तातडीने दुरुस्त केल्या जात आहेत.
- डॉ. प्रदीप कुलकर्णी, नोडल ऑफिसर
(जोड..... दोन परीक्षार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.....)