विनाऔषधी सुदृढ आरोग्य शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:39 AM2017-12-26T00:39:36+5:302017-12-26T00:39:41+5:30
मानवी शरीर हे औषधांच्या दृष्टीने बनलेलेच नाही. एक औषध घेईपर्यंत आजाराचे स्वरूप बदलून जाते. औषधींनी तात्काळ फायदा मिळतो; परंतु भविष्यात या औषधांचा शरीरावर क ाहीना काही विपरीत परिणाम दिसतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मानवी शरीर हे औषधांच्या दृष्टीने बनलेलेच नाही. एक औषध घेईपर्यंत आजाराचे स्वरूप बदलून जाते. औषधींनी तात्काळ फायदा मिळतो; परंतु भविष्यात या औषधांचा शरीरावर क ाहीना काही विपरीत परिणाम दिसतो. जेवणाप्रमाणे औषधी घेण्याचा कल दिसतो. मात्र, योग्य आणि संतुलित आहार घेऊन विनाऔषधी सुदृढ आरोग्य प्राप्त करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी केले.
इंडो-वेतनाम बोर्ड आणि लोकमत यांच्या वतीने रविवारी (दि. २४) तापडिया नाट्यमंदिरात ‘फूड अॅज मेडिसिन’ या विषयावर वैद्यकीय आहार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत टाइम्स कॅम्प्स क्लब हे या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. यावेळी डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप बिश्नोई, इंडो-वेतनाम मेडिकल ग्रुपच्या रेखा सिंग, नागेंद्र सिंग, परमिंदर रियात यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, किडनी स्टोन, ट्यूमर, कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, वायरल फिव्हर अशा अनेक आजारांना व्यक्ती आज सामोरे जात आहे. या आजारांची कारणे, बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.