आज पुन्हा सीईओंसमोर सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:47+5:302021-05-21T04:04:47+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील स्वामी विवेकानंद ॲकॅडमीच्या प्रतिनिधींसोबत शिक्षक व पालकांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासमोर शुक्रवारी ...
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील स्वामी विवेकानंद ॲकॅडमीच्या प्रतिनिधींसोबत शिक्षक व पालकांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासमोर शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीला शाळेच्या प्रतिनिधींनी दांडी मारली होती.
या प्रकरणात ३ पर्याय प्रशासनासमोर असून, एखाद्या संस्थेने ही शाळा चालविण्यासाठी पुढाकार घेतला तरी येथील १६ शिक्षकांचे समायोजन व त्यांना वेतन आयोगानुसार वेतनाचा प्रश्न भेडसावणार आहे. तसेच प्रशासक म्हणून ही देयके देण्याची क्षमता नसल्याने कुणीही जाण्यास तयार होणार नसल्याची शक्यता शिक्षण विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, शिक्षकांनी ठरवल्यास यातून मार्ग निघू शकतो. संस्था आणि शिक्षकांचा वाद मिटत नाही तोपर्यंत या प्रकरणात कोणताही पर्याय निघू शकत नाही, असे सूत्रांचे सांगितले. त्यामुळे सुनावणीत काय निर्णय होतो. प्रतिनिधी येतात का? तसेच शासन काय निर्णय घेते, याकडे पालक, विद्यार्थी व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.