जळगाव महापालिकेच्या महापौर - उपमहापौर निवडणुकीसंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:04 AM2021-03-17T04:04:42+5:302021-03-17T04:04:42+5:30

औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर बुधवारी (दि. १७) न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राज्यातील ...

Hearing on the petition regarding the election of Mayor-Deputy Mayor of Jalgaon Municipal Corporation today | जळगाव महापालिकेच्या महापौर - उपमहापौर निवडणुकीसंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी

जळगाव महापालिकेच्या महापौर - उपमहापौर निवडणुकीसंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी

googlenewsNext

औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर बुधवारी (दि. १७) न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या. मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी, असा

प्रश्नही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ''ऑनलाईन''

निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले आहे. महापौर व उपमहापौरांची निवडणूक १८

मार्चला ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे संबंधित पत्रात म्हटले आहे. ऑनलाईन

निवडणूक घेण्यासंबंधीचा ३ जुलै २०२० व ९ सप्टेंबर २०२० रोजीचा नगर विकास

विभागाच्या अवर सचिवांचे आदेश विषय समिती व सर्वसाधारण सभेसंबंधीचे

असल्याचे याचिकाकर्त्यांनी नमूद

केले आहे. संबंधित आदेश २१ डिसेंबर २०२०च्या पत्राद्वारे मागे घेण्यात

आले आहेत. महापौर व उपमहापौर निवडणूक प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश

असून, पिंप्री चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात नुकत्याच

झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाईन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अमरजितसिंह गिरासे, ॲड. योगेश बोलकर, ॲड. ज्ञानेश्वर बागुल व ॲड. विष्णू मदन पाटील काम

पाहात आहेत.

Web Title: Hearing on the petition regarding the election of Mayor-Deputy Mayor of Jalgaon Municipal Corporation today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.