रस्त्यांसंदर्भातील याचिकेवर आता २८ जूनला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:02 AM2021-06-16T04:02:56+5:302021-06-16T04:02:56+5:30
याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. या ...
याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली.
या संदर्भात ॲड. रुपेश जैस्वाल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत शहरातील अंतर्गत रस्त्त्यांची दुरवस्था सुधारून सौंदर्याकरण करणे, शिवाजीनगर येथील रेल्वे फाटकाजवळील भूमिगत मार्गासह गोलवाडी उड्डाणपुलाच्या कामासंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले आहेत. याचिकेवर वेळोवेळी सुनावणी झाली आहे.
शिवाजीनगर येथील रेल्वे फाटकाजवळील भूमिगत मार्गासह गोलवाडी उड्डाणपुलाच्या कामाच्या संदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ही कामे राज्य शासन आणि रेल्वेतर्फे संयुक्तरीत्या करण्यात येणार आहेत. गोलवाडी येथील उड्डाणपुलाचे काम दीड वर्षात पूर्ण करू, असे रेल्वेने १५ फेब्रुवारी २०२१ च्या पत्रात म्हटले होते. कामाची परवानगी आणि निधी मिळताच निविदा मागवू. मात्र, याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी ॲड. मनीष नावंदर यांनी वेळ मागितला असता खंडपीठाने २८ जूनला सुनावणी ठेवली आहे.