हृदयद्रावक ! कर्णबधीर आजीसमोर तीन नातवंडे बुडाली; दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 07:12 PM2021-10-06T19:12:31+5:302021-10-06T19:14:37+5:30

Three grandchildren drowned in Girija River : आजी कर्णबधीर असल्याने त्यांना बुडणाऱ्या मुलांचा आवाज ऐकू आला नसल्याचा अंदाज आहे.

Heartbreaker! Three grandchildren drowned in front of deaf Grandma; The bodies of two were found | हृदयद्रावक ! कर्णबधीर आजीसमोर तीन नातवंडे बुडाली; दोघांचे मृतदेह सापडले

हृदयद्रावक ! कर्णबधीर आजीसमोर तीन नातवंडे बुडाली; दोघांचे मृतदेह सापडले

googlenewsNext
ठळक मुद्देहट्ट करून नदीवर आजीसोबत आली होती नातवंडे

फुलंब्री ( औरंगाबाद ) : तालुक्यातील वाणेगाव येथील गिरजा नदीच्या पात्रात कर्णबधीर आजीसोबत गेलेली तीन नातवंडे बुडाल्याची ( Three grandchildren drowned) दुर्दैवी घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यातील दोन मुलांचे मृतदेह हाती लागले असून ते दोघे सख्खे भाऊ आहेत. तर अग्निशमन दलाकडून एकाचा शोध सुरु आहे. 

वाणेगाव येथील गिरजा नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मुक्ताबाई रामराव शेजवळ या वृद्धा नातू निलेश आणि त्याचे दोन मित्र गौरव साहेबराव पाचवने ( ६) व विजू साहेबराव पाचवणे ( ११ ) सोबत नदीवरील अर्धवट पुलानजीक कपडे धुण्यास आल्या. तिन्ही मुले पात्रात उतरून पाणी खेळत असताना अचानक बुडाली. हे दृष्य पाहून आजीने मदतीसाठी गावात धाव घेतली. मदतीसाठी ग्रामस्थ येईपर्यंत तिन्ही मुले वाहून गेली होती. ग्रामस्थ आणि पोलिसांना एकाचा मृतदेह आढळून आला. तर अग्निशमन दलास आणखी एका मुलाचा मृतदेह काही अंतरावर सापडला. गौरव व विजू या सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले असून निलेश शेजवळ याचा शोध सुरु आहे. 

हट्ट करून आले होते आजीसोबत
मुक्ताबाई शेजवळ या कर्णबधीर आहेत. त्यांचा नातू आणि इतर दोघे हट्ट करून त्यांच्या सोबत नदीवर आली होती. तिघेही पाण्यात बुडत असताना कदाचित आजीला वेळेवर आवाज आलेला नसावा असा अंदाज आहे.  

हेही वाचा - न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर झाड कोसळले, सुदैवाने कारमधील चारही वकील बचावले

पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन

Web Title: Heartbreaker! Three grandchildren drowned in front of deaf Grandma; The bodies of two were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.