उष्णतेची लाट कायम

By Admin | Published: May 19, 2016 12:08 AM2016-05-19T00:08:13+5:302016-05-19T00:11:47+5:30

औरंगाबाद : शहरातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. सूर्याच्या स्थितीमुळे कमाल तापमानात आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या.

Heat surge continued | उष्णतेची लाट कायम

उष्णतेची लाट कायम

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. सूर्याच्या स्थितीमुळे कमाल तापमानात आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. दरम्यान दुपारनंतर मात्र काही भागात ऊन सावलीचा खेळही बघायला मिळाला.
शहरात दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर आज बुधवारी हा पारा आणखीनच वर चढला. बुधवारी शहरात ४३.८ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान २८.४ अंश इतके राहिले. सकाळपासूनच सूर्य प्रखरतेने आग ओकत होता. सध्या सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेचशहरातील उष्णतेच्या लाटेचा चोरट्यांनी बुधवारी फायदा उचलला. उन्हामुळे ओस पडलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी भरदिवसा २० हजार रुपये लुटले. ही घटना बेगमपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनीत घडली.
पहाडसिंगपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनी येथील रहिवासी अमिनाबेगम सय्यद कासीम (५९) यांना कुटुंबासह अजमेर, दिल्ली येथे दर्शनासाठी जायचे आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून कपडे आणि अन्य खरेदी सुरू केली होती. आज बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा फारुख यांनी खरेदीसाठी घरून रोख २० हजार रुपये आणि जेवणाचा डबा घेऊन शहरात येण्याचे फोनवरून सांगितले. एका बॅगमध्ये रोख रक्कम आणि दुसऱ्या बॅगेत मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन त्या घरून शहरात जाण्यासाठी रोडवर आल्या. उन्हाचा चटका वाढल्याने रस्ता सुनसान होता.
दोन बॅगा घेऊन रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एकट्या महिलेस पाहून आरोपी शेख इकबाल (बाली) याने भर रस्त्यात त्यांना गाठले आणि चाकू लावला.
पैसे दे अन्यथा तुला चाकूने भोसकतो, अशी धमकी दिली. चाकूमुळे घाबरलेल्या अमिनाबेगम यांनी तातडीने रोख रक्कम असलेली बॅग लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ती बॅग हिसकावून तेथून पळ काढला. याप्रसंगी त्यांनी (पान २ वर)
४६ अंशांचा विक्रम
औरंगाबाद शहरात दरवर्षीच मे महिन्यात कमाल तापमान हे सरासरी ४४ अंश सेल्शिअसपर्यंत पोहोचते.
४आतापर्यंतचा इतिहास पाहता शहरात १९०५ मध्ये २५ मे रोजी सर्वाधिक ४६ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालेली असल्याची माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Heat surge continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.