जालना जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंशांवर
By Admin | Published: June 2, 2014 12:24 AM2014-06-02T00:24:56+5:302014-06-02T00:53:04+5:30
जालना :जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तपमान ४३ अंशांवर गेल्याने उष्णतेच्या लाटमुळे आबालवृद्धांचे हाल होत आहेत.
जालना :जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तपमान ४३ अंशांवर गेल्याने उष्णतेच्या लाटमुळे आबालवृद्धांचे हाल होत आहेत. शुक्रवारी रेकॉर्डब्रेक तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट उसळली असून, जनजीवन प्रभावित झाले आहे. दररोज तापमान वाढत जात आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांलयामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दर रोज उन्हाचा पारा चढत आहे. शहरी भागात कडक उन्हामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाच्या झळा बसत आहेत. दुपारच्या वेळी तर कडक ऊन पडत असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहे. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. बाजारपेठेतही दुपारच्या वेळी फारशी गर्दी दिसून येत नाही. घराबाहेर पडताना नागरिक रूमाल बांधतात. ग्रामीण भागातही कडक उन्हामुळे मशागतीच्या कामावर झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तापमान ४२ अंशांच्या वर आहे. शुक्रवारी तापमानात वाढ झाली ४३ अंशांवर तापमान गेले होते. सकाळपासून ते दुपारपर्यंत कडक ऊन पडलेले होते. सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण झाल्याने उकाड्यात वाढ झाली होती. उकाड्याचा लहान मुले व वृद्धांना मोठा त्रास होत आहे. त्यातच विजेच्या भारनियमनामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. (प्रतिनिधी)