अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 06:17 PM2021-11-16T18:17:22+5:302021-11-16T18:18:31+5:30
अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे
औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत वाटपाची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. १५ नोव्हेंबरअखेर ४१ लाख ९१ हजार ५५१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार ५५१ कोटी २७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. विभागातील ५ लाख ८२ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.
अतिवृष्टीमुळे तब्बल ३६ लाख ५२ हजार हेक्टरवरील खरीप पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. विभागातील ४७ लाख ७४ हजारांहून अधिक शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले. मराठवाड्याच्या वाट्याला आलेल्या पहिल्या टप्प्यातील २८२१ पैकी २५५१ कोटी रुपयांचे वाटप झाले. ९० टक्क्यांपर्यंत अनुदान बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे. विभागातील ५ लाख ८२ हजारांच्या आसपास शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत अनुदान वाटप होईल, तसेच जुलै महिन्यात झालेल्या पीक नुकसानीसाठी ३६ कोटींची मागणी शासनाकडे केली असून, ती रक्कम येत्या काही दिवसांत मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
नुकसानभरपाई कोणत्या जिल्ह्यात किती ?
जिल्हा ----एकूण प्राप्त अनुदान ----- शेतकरी ------ वितरित अनुदान ------ वितरणाची टक्केवारी
औरंगाबाद --४१६ कोटी ५४ लाख ----५६९७०५ - --- ३४८ कोटी ४३ लाख - -- ८३.६५
जालना ---४२५ कोटी ७ लाख--- - -५५९१२३ - ------३८७ कोटी ५६ लाख --- ९१.१७
परभणी ---२५५ कोटी १९ लाख ---- ४४१३७१ - ----२४२ कोटी ३५ लाख -----९४.९७
हिंगोली----२२२ कोटी ९४ लाख ---- २९७८६७---- - २०८ कोटी ५८ लाख ---- ९३.५६
नांदेड---- -४२५ कोटी ३६ लाख -----५९५८२९ ----- ३४३ कोटी ४८ लाख -----८०.७५
बीड -----५०२ कोटी ३७ लाख ----- ८४८०३७ ----- ४८० कोटी ०५ लाख ----- ९५.५६
लातूर -----३३६ कोटी ५६ लाख - ----४६१८२४ - ---३१५ कोटी १९ लाख ----- ९३.६५
उस्मानाबाद --२३७ कोटी ६१ लाख - ----४१७७९५ -----२२५ कोटी ६१ लाख- ---९४.९५
एकूण -----२८२१ कोटी ६७ लाख-----४१९१५५१--- --२५५१ कोटी २७ लाख ---९०.४३ टक्के