शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस

By Admin | Published: August 12, 2015 12:44 AM2015-08-12T00:44:25+5:302015-08-12T00:57:06+5:30

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर पाऊस झाला. भिजपावसानंतर आज झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा आहे.

Heavy rain in the district along with the city | शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस

शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस

googlenewsNext


जालना : जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर पाऊस झाला. भिजपावसानंतर आज झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा आहे. घनसावंगी तालुक्यात सकाळी झालेल्या पावसामुळे नदी, नाले, बंधारे खळखळून वाहत होते. दरम्यान, आजच्या पावसाने दुबार पेरणी टळेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जालना, घनसावंगी, अंबड, जाफराबाद तालुक्यात पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अंबड तालुक्यातील काही भाग आणि घनसावंगी तालुक्यात सकाळी व जालना तालुक्यात दुपारी दोन वाजेनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. जालना शहरात झालेल्या पावसामुळे सुभाष चौक, गांधीचमन, लक्कडकोट पूल या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy rain in the district along with the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.