दुधड परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:56+5:302021-06-10T04:05:56+5:30
जून महिन्याच्या सुरुवातीलाच परिसरात प्रथमच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पहिल्याच पावसात लहुकी नदीला पूर आला होता. दोन तास पडलेल्या ...
जून महिन्याच्या सुरुवातीलाच परिसरात प्रथमच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पहिल्याच पावसात लहुकी नदीला पूर आला होता. दोन तास पडलेल्या पावसामुळे समृद्धी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. समृद्धी महामार्गावरून पावसाच्या वाहत्या पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने वेळेत पूर्ण केले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. भांबर्डा येथील शेतकरी राजेंद्र पठाडे, गणेश पठाडे, भाऊसाहेब पठाडे, जनार्धन पठाडे, अंबादास पठाडे, संजय पठाडे यांच्या साठवून ठेवलेल्या कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. समृद्धी महामार्गावर चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या पुलामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूचे पाणी थेट शेतीतून गावात शिरून मोठे नुकसान झाले असल्याचे भांबर्डा येथील सरपंच इंदूबाई पठाडे यांनी सांगितले.