वाळूज महानगरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:17 PM2019-09-03T23:17:49+5:302019-09-03T23:17:58+5:30
वाळूज महानगरात मंगळवारी (दि.३) रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.
वाळूज महानगर : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगरात मंगळवारी (दि.३) रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागला.
आठवडाभराच्या विश्रांतीनगर वाळूज महानगरात ३० आॅगस्ट रोजी पावसाने दमदार हजेरी लावली होती. दोन दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मंगळवारी रात्री हजेरी लावली. सायंकाळपासून वातावरणात बदल झाल्याने आकाशात ढग दाटून आले होते.
रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरुच होत्या. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
बजाजनगर, पंढरपूर, सिडको वाळूज महानगर, वळदगाव, तीसगावसह परिसरात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांना जिवदान ठरणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.