मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:01 PM2018-08-22T14:01:24+5:302018-08-22T14:04:10+5:30

मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे.

Heavy rainfalls stroke to Marathwada region; Heavy Rainfall in 83 circles | मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर 

मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर 

googlenewsNext
ठळक मुद्दे मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. १६ रोजी १८३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाल्यानंतर २० आॅगस्टच्या पावसाने ८३ मंडळांत अतिवृष्टीच्या पुढे जाऊन पावसाने हजेरी लावली.  नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजार, बनोटी, चिंचोली लिंबाजी मंडळांत ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील तळणी मंडळात, परभणीतील पिंगळी, पालम, पूर्णा, ताडकळस, देऊळगाव, पाथरी, हदगाव, तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, माळहिवरा, सिरसम, वासंबा, कळमनुरी, नांदापूर, आ. बाळापूर, हयातनगर, औंढा नागनाथ, जवळाबाजार, येहळेगाव, साळना मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, लिंबगाव, तरोड, मुदखेड, मगळ, बारड, अर्धापूर, दाभाड, मालेगाव, भोकर, किणी, मोगाळी, मातूळ, उमरी, सिंधी, गोळेगाव, कंधार, कुरुला, उस्मानपूर, पेठवडज, फुलवळ, बरूळ, लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड, शिवडी, कापशी, किनवट, जलधारा, शिवणी, हदगाव, तामसा, पिंपरखेड, तळणी, आष्टी, हिमायतनगर, सरसम, जवळगाव, खानपूर, शहापूर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, कुंडलवाडी, धर्माबाद, जरिकोट, करखेली, नायगाव, नरसी, मांजरम, बरवडा, कुंटूर, मुखेड मंडळांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात पिंपळगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

६ दिवसांत १८ टक्के पाऊस
सहा दिवसांत मराठवाड्यात १८ टक्के पाऊस वाढला आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ४० टक्क्यांवर पाऊस येऊन थांबला होता. त्यामुळे विभागातील खरीप हंगाम धोक्यात असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला दिला होता. १६ रोजी पावसाने पुनरागमन करीत मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. या सहा दिवसांत विभागात १८ टक्के इतका पाऊस झाला आहे. आजवर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. १८ टक्क्यांनी पाऊस वाढला असला तरी खरीप हंगामाला त्याला किती लाभ होईल हे सांगता येणार नाही.

तीन जिल्ह्यांत नुकसान
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांतील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरून तेथील संसार उघड्यावर आले आहेत.  

Web Title: Heavy rainfalls stroke to Marathwada region; Heavy Rainfall in 83 circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.